सासू-सुनेच्या वादात सुनेला जमावाची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 12:49 IST2019-06-08T12:49:40+5:302019-06-08T12:49:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पतीसंदर्भात सासूला विचारल्याचा राग येवून सासूसह 16 जणांनी महिलेस जबर मारहाण केल्याची घटना कोपर्ली, ...

Suicide bombed assault in the case of mother-in-law | सासू-सुनेच्या वादात सुनेला जमावाची मारहाण

सासू-सुनेच्या वादात सुनेला जमावाची मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पतीसंदर्भात सासूला विचारल्याचा राग येवून सासूसह 16 जणांनी महिलेस जबर मारहाण केल्याची घटना कोपर्ली, ता.नंदुरबार येथे घडली. याप्रकरणी जमाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
होळतर्फे हवेली, ता.नंदुरबार येथील माहेर असलेली लक्ष्मीबाई सुकदेव भिल या महिलेने             सासरी कोपर्ली येथे जात सासूला           पती विषयी विचारले. त्याचा राग  सासू उषाबाई पवार यांना                   आला. त्यातून त्यांनी सून लक्ष्मीबाई यांच्याशी वाद घातला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. लक्ष्मीबाई हिला जमावाने हाताबुक्यांनी आणि काठीने जबर मारहाण केली. त्यात ती जखमी झाली.
याबाबत लक्ष्मीबाई यांनी फिर्याद दिल्याने उषाबाई सुरेश पवार, सुदाम साधू पवार, बदाम सुदाम पवार, सुनील सुदाम पवार, अनिल सुदाम पवार, आशाबाई सुदाम पवार, सुपाबाई उखडय़ा भिल, सखुबाई सदाशिव भिल, मखुबाई युवराज भिल, भिकूबाई उत्तम भिल, वंदनाबाई दिनेश भिल, प्रमिलाबाई सुरेश भिल, दिनेश सुपडू भिल, सुदेश सदाशिव भिल, जिजाबाई नाना भिल, प्रकाश सदाशिव भिल सर्व रा.कोपर्ली, ता.नंदुरबार यांच्याविरुद्ध तालुका पोलिसात मारहाण व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार सदाराव करीत आहे. 

Web Title: Suicide bombed assault in the case of mother-in-law