आयान कारखान्यातर्फे ऊसाला 2,345 रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:12 IST2019-11-22T12:12:27+5:302019-11-22T12:12:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आयान मल्टीट्रेड साखर कारखान्याने यंदा ऊसाला प्रतीटन 2,345 रुपये भाव जाहीर केला आहे. कारखान्याचा ...

Sugarcane price of Rs 2,345 by Ian factory | आयान कारखान्यातर्फे ऊसाला 2,345 रुपये भाव

आयान कारखान्यातर्फे ऊसाला 2,345 रुपये भाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आयान मल्टीट्रेड साखर कारखान्याने यंदा ऊसाला प्रतीटन 2,345 रुपये भाव जाहीर केला आहे. कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवार, 21 रोजी करण्यात आला. 
समशेरपूर, ता.नंदुरबार येथील खाजगी तत्वावरील आयान मल्टीट्रेड या साखर कारखान्याचा गाळप हंगामाचा शुभारंभ ज्येष्ठ ऊस उत्पादक सभासदाच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.सी.बडगुजर उपस्थित होते. गेल्यावर्षी देखील कारखान्याने सर्वाधिक भाव दिल्याचे बडगुजर यांनी सांगून यंदाही ही परंपरा कायम राखत 2,345 रुपये भाव जाहीर केला. गेल्या हंगामापेक्षा यंदाचा ऊस दर हा 165 रुपये जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. यंदाच्या गाळप हंगामात 4.50 लाख टन ऊस गाळप केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यंदापासून कारखान्याने शेतक:यांच्या बांधावर तंत्रज्ञान पोहचविण्यासाठी ई-स्मार्ट शुगर ऊस तोडणी, वजनकाटा व्यवस्थापन या अत्याधुनिक स्वयंचलित प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. संचालक सचिन शिनगारे, अतुल क्षिरसागर, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.     
 

Web Title: Sugarcane price of Rs 2,345 by Ian factory