‘मिशन १००’साठी ऊस उत्पादकांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 12:43 IST2020-08-06T12:43:11+5:302020-08-06T12:43:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह परिसरात ऊस पिकाची जोरदार वाढ सुरू असल्याचे चित्र आहे. शेतकरींकडून ऊस ...

‘मिशन १००’साठी ऊस उत्पादकांचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह परिसरात ऊस पिकाची जोरदार वाढ सुरू असल्याचे चित्र आहे. शेतकरींकडून ऊस पिकाचे वेळोवेळी योग्य व्यवस्थापन करण्यात येत असल्याने मिशन १०० च्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
तळोदा तालुका जिल्ह्यात सर्वाधिक ऊस पुरवठा करणारा तालुका म्हणून ओळखला जात असून, यावर्षीही मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र वाढले आहे. पुरेसा पाऊस झाला नसला तरीही कुपनलिकांद्वारे उसाला पाणी देणे सुरूच असून, वेळोवेळी खतांचीही मात्रा देण्यात आल्याने ऊस पीक जोमदार असून, चांगले उत्पन्न येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, शेतकरींकडून पावसाळा सुरू होण्यापूर्वी ऊस पिकाला खतांची योग्य मात्रा देऊन ऊस पिकाची बांधणी करून पाणी देण्यात येत होते. तसेच उसाच्या खालच्या भागातील वाळलेली, पिवळी पडलेली पाने काढून टाकण्यात आल्याने पाऊस येताच ऊस पीक वाढीस मदतीचे ठरले आहे. तसेच काही शेतकरींनी ऊस पीक ठिबकवर लागवड केले असून, त्यांच्याकडून रासायनिक खतांची मात्रा ठिबक संचातून व्हेंचुरीतून देण्यात येत असून, हा ऊसही जोमोन वाढला आहे. एकूण दोन महिने जोरदार पाऊस झाल्यास ऊस पिकास मोठा फायदा होणार असून, एकरी १०० उत्पादनाच्या जवळपास उत्पन्न जाऊ शकते, असे शेतऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
सुपीक शेतजमीन, योग्य ऊस लागवड पद्धत, वेळोवेी रासायनिक खतांची मात्रा, पाण्याचे व्यवस्थीत नियोजन, ऊस पिकाचे संरक्षण याबाबत व्यवस्थापन केले अूसन, यावर्षी एकरी उत्पन्नात चांगली वाढ होणार आहे.
-योगेशराजे भोसले, शेतकरी, रांझणी
ऊस लागवड, बांधणी, पाणी देणे यासारख्या गोष्टी समक्ष केल्याने ऊस वाढीस फायदा झाला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने पूर्ण वेळ शेतातच फोकस केल्याने तसेच वेळोवेळी जाणकारांचे मार्गदर्शन मिळाल्याने ऊस पीक जोमात असून, खतांची मात्राही पुरेशा प्रमाणात देण्यात येत आहे.
-किशोर भारती, शेतकरी, तळोदा