आयान कारखान्याने दिला उसाला दहा वर्षांतील सर्वोच्च दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST2021-02-10T04:31:45+5:302021-02-10T04:31:45+5:30
कारखान्याच्या ऊस गाळपासंदर्भात माहिती देताना एन. एस. सिनगारे यांनी सांगितले की, आयान साखर कारखान्याने ऊसदराची उच्चांकी परंपरा कायम राखली ...

आयान कारखान्याने दिला उसाला दहा वर्षांतील सर्वोच्च दर
कारखान्याच्या ऊस गाळपासंदर्भात माहिती देताना एन. एस. सिनगारे यांनी सांगितले की, आयान साखर कारखान्याने ऊसदराची उच्चांकी परंपरा कायम राखली आहे. यावर्षी उसाला एकरकमी २ हजार ४२५ रुपये प्रतिमेट्रिक टन दर घोषित करण्यात आला आहे. दहा वर्षांची तुलना करता हा सर्वाधिक दर आहे. ऊस उत्पादक जास्तीत जास्त ऊस कारखान्यास देतील, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला. कारखान्याची अत्याधुनिक गाळप क्षमता विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे कारखाना दररोज सात हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करत आहे. कारखान्याने वीज निर्मिती प्रकल्प उभारला आहे. कारखान्यात दररोज वीज निर्मिती होत आहे. ही वीज महावितरणला दिली जात आहे. त्याचाही कारखान्याच्या उत्पादन क्षमतेला लाभ होणार आहे.
गाळप क्षमता वाढीसाठी नियोजन केलेले असताना कोविड-१९ सारखे महाभयंकर संकट ओढवले. या संकटावर मात करत कारखाना पूर्ण क्षमतेने नव्हे तर अधिक क्षमतेने सुरू करण्यास यश आले. कारखान्याकडे नोंद आणि बिगर नोंद संपूर्ण ऊस गाळपाचे नियोजन करण्यात आले आहे. हा सर्व ऊस गाळप होईपर्यंत कारखाना सुरू राहील. उपलब्ध संपूर्ण उसाचे गाळप वेळेवर करून घेण्यात येईल. अत्याधुनिक मशिनरीचा वापर करून गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती सिनगारे यांनी यावेळी दिली.