रोझवा शिवारातील आगीत पाच एकरावरील ऊस खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 18:29 IST2019-02-10T18:29:07+5:302019-02-10T18:29:12+5:30
रांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा शिवारात शॉटसर्क्रिटमुळे लागलेल्या आगीत पाच एकर क्षेत्रातील ऊस शुक्रवारी जळून खाक झाला़ या घटनेमुळे ...

रोझवा शिवारातील आगीत पाच एकरावरील ऊस खाक
रांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा शिवारात शॉटसर्क्रिटमुळे लागलेल्या आगीत पाच एकर क्षेत्रातील ऊस शुक्रवारी जळून खाक झाला़ या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली होती़
चिनोदा येथील शेतकरी महेंद्र बबनराव मराठे यांचे रोझवा शिवारात गट नं़ 47/1 हे उसाचे क्षेत्र असून यात आठ एकर उसाची लागवड करण्यात आली होती़ शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विद्युत ट्रॉन्सफार्मरवर शॉटसक्र्रिट होऊन काही ठिणग्या उसावर पडल्याने ऊसाने पेट घेतला़ त्यातच वेगाने वारे वाहत असल्याने क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण करीत पाच एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला़ तरी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतक:यांकडून करण्यात येत आली आह़े दरम्यान, रांझणीसह रोझवा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून दिवसभर जोरदार वारे वाहत असल्याने जीर्ण झालेल्या विद्युततारा एकमेकांना स्पर्श करीत आहेत़ यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आह़े तळोद्यात काही ठिकाणी उसतोड बाकी आह़े त्यामुळे उसतोडीबाबत येथील शेतकरी मेटाकुटीस आले आहेत़ त्यातच आता जीर्ण वीज तारांची समस्या जाणवू लागली असल्याने बळीराजा चिंताग्रस्त आह़े