चिनोदा शिवारातील आगीत 13 एकरावरील ऊस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 12:12 IST2019-02-22T12:11:52+5:302019-02-22T12:12:26+5:30

शॉर्टसर्किट : शेतक:यांचे आर्थिक नुकसान, उपाय योजना कराव्या

Sugarcane on 13 acres of fire in Chinoda Shivar | चिनोदा शिवारातील आगीत 13 एकरावरील ऊस खाक

चिनोदा शिवारातील आगीत 13 एकरावरील ऊस खाक

तळोदा : तळोदा शहराजवळ असलेल्या चिनोदा गावशिवारात दोन शेतक:यांच्या साधारणत: 13 एकर उसाच्या क्षेत्राला आग लागल्याने संपूर्ण ऊस जळून खाक झाला़ यात शेतक:यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतक:यांकडून करण्यात येत आह़े
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिनोदा गावातील शिवारात कन्याबाई राजेंद्र राठोड यांच्या मालकीचे पाच एकर व त्याच्या शेताला लागून कविताबाई पुरुषोत्तम ठक्कर यांचे आठ एकर उसाचे क्षेत्र आह़े दरम्यान या शेतांमध्ये अचानक आग लागल्याने संपूर्ण ऊस जळून खाक झाला आह़े ही घटना गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली़ यात, राठोड यांचे तीन लाख तर ठक्कर यांचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आह़े दोन्ही शेतक:यांचे मिळून सुमारे तेरा लाख रुपयांचे उसाचे क्षेत्र जळून खाक झाले आह़े 
दरम्यान उसाच्या क्षेत्राला आग लागल्याचे वृत्त कळताच शेतक:यांनी शेताकडे धाव घेतली़ मात्र तोर्पयत संपूर्ण क्षेत्रावरील ऊस जळून खाक झालेला होता़ शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे परिसरातील शेतक:यांकडून सांगण्यात आल़े शेतक:यांच्या तक्रारीवरुन अगAीउपद्रव या घटनेनुसार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आह़े पुढील तपास बळवंत वळवी हे करीत आहेत़ 
दरम्यान, ऊस तोडणीवर आला असल्याने बहुतेक शेतक:यांकडून उसाला पाणी देणे आता बंद करण्यात आले आह़े त्यामुळे साहजिकच उसाचे क्षेत्र पुर्णपणे कोरडे झालेले दिसून येत आह़े कारखाने व खांडसरी शेतक:यांच्या शेतात उसतोड लावून घेण्यास विलंब करीत असल्याने ब:याच दिवसांर्पयत उसाचे क्षेत्र जैसे थे अवस्थेत पडून आह़े त्यामुळे आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत़ 
 

Web Title: Sugarcane on 13 acres of fire in Chinoda Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.