11 लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा पार होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 12:58 IST2018-04-12T12:58:19+5:302018-04-12T12:58:19+5:30

विक्रमी साखर उत्पादन : तिन्ही कारखान्यांची स्थिती, आणखी आठवडाभर सुरू राहणार

Sugar production will cross 11 lakh quintals | 11 लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा पार होणार

11 लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा पार होणार

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 12 : यंदा मुबलक प्रमाणातील ऊस लक्षात घेता अद्यापही जिल्ह्यातील दोन्ही साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. आणखी आठवडाभर कारखाने सुरू राहणार आहे. यंदा तिन्ही कारखान्यांनी विक्रमी अर्थात 10 लाख 83 हजार 220 क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सर्वाधिक उत्पादन अॅस्टोरिया शुगर कारखान्याने एकुण पाच लाख 27 हजार क्विंटल केले आहे.
जिल्ह्यात यंदा मोठय़ा प्रमाणावर ऊस उपलब्ध होता. त्यामुळे साखर कारखान्यांचा हंगाम सुरळीत चालेल असा अंदाज होता. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात कारखाने सुरू झाले. जवळपास पाच ते साडेपाच महिने कारखाने सुरू राहिले आहेत. अद्यापही शेकडो एकरवर ऊस उभा आहे. येत्या आठवडाभरात शिल्लक ऊस देखील गाळप केला जावून कारखान्यांच्या गळीत हंगामाचा समारोप होणार आहे.
सर्वाधिक दिवस चालले
गेल्या पाच ते सात वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वाधिक काळ साखर कारखाने सुरू राहिले आहेत. सातपुडा व अॅस्टोरिया या दोन्ही साखर कारखान्यांनी प्रत्येकी दीडशे दिवसापेक्षा अधीक काळा हंगाम सुरू ठेवला आहे. दोन्ही कारखान्यांची आपल्या क्षमतेच्या तुलनेत साखर उत्पादन केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. अनेक वर्षानंतर एवढे दिवस हंगाम सुरू राहणे आणि क्षमतेएवढे गाळप करण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे कारखाना व्यवस्थापन आणि शेतक:यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.
यंदा पळवापळवी नाही
यंदा सर्वच साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध असल्यामुळे यंदा ऊसाची पळवापळवी फारशी झाली नाही. गेल्या हंगामात गुजरातमधील काही साखर कारखान्यांनी ऊस पळविला होता. ज्या शेतक:यांनी ऊस दिला होता त्या शेतक:यांना पेमेंट मिळण्यासाठी मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यासाठी शेतकरी संघर्ष समिती देखील स्थापन करावी लागली होती. तो अनुभव पहाता यंदा शेतक:यांनी बाहेरील साखर कारखान्यांना थारा दिला नाही. केवळ लगतच्या गुजरात व मध्यप्रदेशातील खांडसरींनी ऊस नेला. परंतु तेथेही पेमेंटबाबत सुरक्षीतता असल्यामुळे तेथे ऊस देण्याबाबत शेतक:यांनी हिंमत दर्शविली.
पुढील वर्षीही ब:यापैकी
पुढील वर्षी देखील ब:यापैकी ऊस उपलब्ध राहणार असल्याची शक्यता आहे. ऊस हे 10 ते 12 महिन्यांचे पीक असते. परिपक्व झाल्याशिवाय तोडता येत नाही. कमी दिवसाचा किंवा अपरिपक्व ऊस तोडणी झाल्यास त्याचा उतारा योग्य रितीने मिळत नाही. त्यामुळे कारखाने देखील पुर्ण दिवसाचा व परिपक्व ऊस तोडण्यालाच प्राधान्य देतात. यंदा ऊस लागवडीचे क्षेत्र पहाता पुढील वर्षाचा गळीत हंगाम देखील ब:यापैकी राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने कारखान्यांनी नियोजन देखील करून ठेवले आहे.
दीडशे दिवस गाळप
यंदा सातपुडा व अॅस्टोरिया या दोन्ही कारखान्यांनी दिडशे दिवसापेक्षा अधीक तर आदिवासी साखर कारखान्याने 110 दिवस गाळप केले आहे. ऊसाची उपलब्धता लक्षात घेता अॅस्टोरिया साखर कारखाना 16 एप्रिलपर्यत सुरू राहणार आहेत. तर सातपुडा साखर कारखाना देखील आणखी आठवडाभर सुरू राहणार आहे. सर्व शेतक:यांचा नोंदीचा ऊस गाळप केल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही असा विश्वास देखील कारखाना व्यवस्थापनाने शेतक:यांना दिला आहे.
 

Web Title: Sugar production will cross 11 lakh quintals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.