महिलेने केला चोरटय़ाशी यशस्वी प्रतिकार; महिला जखमी, चोरटा पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 13:00 IST2019-09-06T12:59:59+5:302019-09-06T13:00:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  स्त्री ही अबला नसुन सबला आहे.  जर दुर्गा, भवानी बनली तर ती दुर्जनांना नष्ट ...

Successful Resistance to Female Cheating; Woman injured, stabbed | महिलेने केला चोरटय़ाशी यशस्वी प्रतिकार; महिला जखमी, चोरटा पसार

महिलेने केला चोरटय़ाशी यशस्वी प्रतिकार; महिला जखमी, चोरटा पसार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  स्त्री ही अबला नसुन सबला आहे.  जर दुर्गा, भवानी बनली तर ती दुर्जनांना नष्ट करण्याची ताकद ठेवते हे ती सिध्द करते. याचा प्रत्यय काल बुधवारी रात्री नवापूरच्या एका घटनेतुन आला आहे.
नवापूर शहरातील मंगलदास पार्ककडील शेवटच्या टोकावर इंग्लीश मिडीयम शाळेसमोर दिपश्री गजानन उपासणी यांचे घर आहे. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घराच्या ओट्यावर मोबाईल संभाषण करीत असलेल्या शिक्षिकेवर  भरधाव वेगात दुचाकीवर आलेल्या चोरटय़ाने हल्ला करुन मोबाईल व गळ्यातील सोन्याची चैन हिसकावण्याचा प्रय} केला. तोंडावर रुमाल बांधलेल्या अज्ञात इसमाच्या या कृतीमुळे घाबरुन गेलेल्या शिक्षिकीने स्वत:ला सावरून घेत चोरटय़ाला प्रतिकार करत त्याचा सामना केला. धाडसाने त्यांनी त्या चोरटय़ाशी झटापटी करुन चांगलीच फाईट दिली. घरात असलेल्या पती व मुलास बाहेर काय चालले आहे याची भनक लागली नाही. चोराशी झटापटी करत त्या खाली पडल्याने जोराचा आवाज आला व त्या ओरडल्या. त्यांचा आवाज ऐकताच पती व मुलगा बाहेर धावुन आले. अंधाराचा    फायदा घेत चोरटा पळून गेला. या झटापटीत दिपश्री उपासनी यांचा डावा डोळा, हात व पायला दुखापत झाली आहे. घटनेनंतर परिसरातील लोक धावुन आले. दुचाकी घेऊन चोरटा ज्या दिशेत गेला तिकडे लोकांनी शोध घेतला. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. चोरटयाने पांढ:या रंगाचा सदरा घातला होता व तोंडावर रुमाल बांधला होता. जवळच असलेले रेल्वे रुळ ओलांडून तो दिसेनासा झाला.  शिक्षक दिनाच्या पुर्व संध्येला शिक्षिकेने केलेली कामगिरी स्त्रीयांना हिम्मत, प्रेरणा व धाडस देणारी ठरली आहे. दिपश्री गजानन उपासनी या नवापूर येथील डि. जे. अग्रवाल शाळेत शिक्षिका आहेत. पती गजानन यांचे नवापूर येथे चष्माचे  दुकान   आहे.

नवापूर शहरातील मंगलदास पार्क भागातील हा परिसर रेल्वे रुळाकडे येत असुन शेवटच्या टोकावर आहे.जनता पार्क, मंगलदास पार्क व शेफाली पार्क  हा नोकरदार व उच्चभ्रु लोकांच्या वास्तव्याचा भाग आहे. शेवटचा भाग असल्याने तेथील रस्ते नेहमी सायंकाळी लवकरच सामसूम होतात. येथून जवळच रेल्वे रुळ व लागुन पुढे लालबारीचा पाडा आहे. इंग्लिश मिडीयम शाळेच्या जवळ रस्त्यावरही नेहमी सन्नाटा असतो. पथदिवे नेहमी बंद राहुन अंधार असतो.
 

Web Title: Successful Resistance to Female Cheating; Woman injured, stabbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.