रोझवा पुनर्वसन क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचा वाल लागवडीचा प्रयोग यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 13:15 IST2021-02-11T13:14:56+5:302021-02-11T13:15:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथील प्रकल्पबाधित उदेसिंग लिवा पावरा याने आपल्या चार एकर क्षेत्रात ...

Successful experiment of hair planting of project affected farmers in Rozwa Rehabilitation Area | रोझवा पुनर्वसन क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचा वाल लागवडीचा प्रयोग यशस्वी

रोझवा पुनर्वसन क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचा वाल लागवडीचा प्रयोग यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथील प्रकल्पबाधित उदेसिंग लिवा पावरा याने आपल्या चार एकर क्षेत्रात पापडी वालची लागवड करून उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. बहुधा तळोदा तालुक्यातून शेंगवर्गीय पापडी वाल पिकाचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेण्याचा हा पहिलाच प्रयोग असावा, असे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. 
दरम्यान, ह्या बाधिताने आपले वडील लिवा पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पाण्याच्या उत्तम निचरा होणाऱ्या शेत जमिनीत ठिबकच्या साहाय्याने मल्चिंग पेपरवर वालची बीची लागवड केली. पापडी वालचे वेळोवेळी देखरेख करून या पिकावर भुरी रोगासारखा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी खबरदारी घेत कीटक नाशकाचीही फवारणी करून त्यानंतर आंतर पीक म्हणून गवारची लागवड केली आहे. त्यामुळे पापडी वालचे उत्पन्न घेतल्यानंतर लगेच गवार काठणीस सुरुवात होण्यास मदत होणार आहे.
अद्यापपोवेतो वाल हे सातपुडा परिसरात ग्रामीण भागात घराच्या अवती भोवती, शेतबांधावर, परस बागांमध्येच लावलेले दिसत होते. परंतु प्रथमच हे शेंगवर्गीय पिकाची लागवड बाधिताने करून उत्पन्न घेतल्याने उत्पादनातून अर्थाजनासोबतच जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत होणार असून, त्याबरोबरच पिकांची फेर पालट होण्यासाठीही हे पीक महत्त्वाचे ठरणार आहे.
सध्या पापडी वाल बाजारपेठेत ३० ते ३५ रुपये किलो दराने खरेदी करण्यात येत असून, थंडीत खवैय्यांकडून वालला वाढती मागणी आहे. ह्या शेंगाची पाच ते सात दिवसांनंतर तोडणी करण्यात येत आहे.


कमी खर्चात वालचे उत्पादन
वालचे बियाणे स्वस्त मिळत असून, लागवड केल्यानंतर दोन - अडीच महिन्यात तोडणी सुरू होत असते. तसेच या पिकाला सिंचनाचीही जास्त गरज नसून, रासायनिक खतांचीही आवश्यकता भासत नसून, ढगाळ हवामान असल्यास फवारणी करावी लागते. त्यामुळे इतर पिकांपेक्षा पापडी वालच्या उत्पादनास कमी खर्च लागत असल्याचे उदेसिंग पावरा यांनी सांगितले.

Web Title: Successful experiment of hair planting of project affected farmers in Rozwa Rehabilitation Area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.