उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली बोरदला शेतकऱ्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:33 IST2021-08-28T04:33:58+5:302021-08-28T04:33:58+5:30
दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांनी सांगितले की, बोरद पाेलीस दूरक्षेत्राला एक चारचाकी वाहन उपलब्ध करून देण्यात येईल. ...

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली बोरदला शेतकऱ्यांची बैठक
दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांनी सांगितले की, बोरद पाेलीस दूरक्षेत्राला एक चारचाकी वाहन उपलब्ध करून देण्यात येईल. परंतु या गस्ती पथकात पोलिसांबरोबर शेतकऱ्यांनीही गस्त घालण्याचे आवाहन केले. तसेच येथील दूरक्षेत्रात कर्मचारी नियमित उपस्थित राहतील, अशी ग्वाही दिली. तसेच पिकांची नासधूस करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्यात येणार असून, येणाऱ्या सण उत्सवात नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करून घरच्या घरी साध्या पद्धतीने सण-उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
सभेस सहायक पोलीस निरीक्षक अविनाश केदार, दत्तू रोहिदास पाटील, रमाकांत सुदाम पाटील, मंगलसिंग चव्हाण, विजयसिंग राणा, दयानंद चव्हाण, नरहर ठाकरे, मंगेश पाटील, सुकलाल ठाकरे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. या बैठकीसाठी बोरद पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी निलेश खोंडे, छोटू कोळी, राजू जगताप आदींनी परिश्रम घेतले.