मुकबधिर विद्यार्थ्यांचा स्टॅच्यू आॅफ युनिटीवर अभ्यास दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:46 IST2020-03-02T11:46:28+5:302020-03-02T11:46:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सोनाई अपंग विकास व शिक्षण संस्था संचलित मुकबधिर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल अंतर्गत ...

मुकबधिर विद्यार्थ्यांचा स्टॅच्यू आॅफ युनिटीवर अभ्यास दौरा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सोनाई अपंग विकास व शिक्षण संस्था संचलित मुकबधिर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल अंतर्गत गुजरातमधील स्टेच्यू आॅफ युनिटीला भेट दिली.
शैक्षणिक सहल अंतर्गत मुकबधिर विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरा काढण्यात आला. अभ्यास दौऱ्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, परिसरातील बगीचा, धरण तसेच म्युझियम आदी ठिकाणी भेट दिली. यावेळी पटेल यांचा जीवनपट, पुतळा व धरणाविषयी मुख्याध्यापक राजेश चौधरी यांनी माहिती दिली. सहलीला विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुकबधिर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसून आला.