वृक्षसंवर्धन प्रतिष्ठानतर्फे अभ्यास दौरा व वृक्षसंवर्धन अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST2021-06-02T04:23:39+5:302021-06-02T04:23:39+5:30
या अभ्यास दौऱ्यात वृक्षांची लागवड कशी करावी, कोणते वृक्ष लावणे आवश्यक आहे, त्यांची वाढ कशी करावी, पाण्याचे नियोजन कसे ...

वृक्षसंवर्धन प्रतिष्ठानतर्फे अभ्यास दौरा व वृक्षसंवर्धन अभियान
या अभ्यास दौऱ्यात वृक्षांची लागवड कशी करावी, कोणते वृक्ष लावणे आवश्यक आहे, त्यांची वाढ कशी करावी, पाण्याचे नियोजन कसे केले आहे. वृक्षसंवर्धनासाठी नि:स्वार्थ व कशाप्रकारे मेहनत घेतली व केली जात आहे आदी गोष्टींचा अभ्यास करण्यात आला. अमळनेर येथील टेकडी ग्रुपशी येथील प्रतिष्ठानतर्फे प्रदीप पाटील, ज्ञानी कुलकर्णी, अनिल पाटील, अंशुमन पाटील, सतीश सोनवणे, माधव पाटील यांनी चर्चा केली. वृक्षसंवर्धनासाठी काय केले पाहिजे याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी प्रतिष्ठानच्या प्रतिनिधींमार्फत वृक्षारोपणही करण्यात आले. प्रतिष्ठानतर्फे ज्ञानी कुलकर्णी यांनी टेकडी ग्रुपचे आभार मानले. त्याचप्रमाणे अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर परिसरात झालेले वृक्षारोपण व दोंडाईचा येथील हस्ती स्कूलच्या परिसरातील टेकडीवरचे वृक्षारोपण व जलनियोजन कसे केले आहे याचीही पाहणी केली. शहाद्याजवळील हनुमान टेकडी (अनरदबारी) याठिकाणीही वृक्षसंवर्धन प्रतिष्ठानतर्फे टेकडी हिरवीगार करण्याचा संकल्प केला असून, तसे अभियान याच पावसाळ्यापासून सुरू करणार आहेत. यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या अभ्यास दौऱ्यात प्रदीप पाटील, प्रा.ज्ञानी कुलकर्णी, अनिल पाटील, अंशुमन पाटील, माधव पाटील, के.के. सोनार, गुलाल पाटील, नवल वाघ, राजेंद्र माळी, विलास पाटील, भूषण बाविस्कर, गुणवंत पाटील, मनोज पाटील, जगन पाटील, किशोर पाटील, आर.टी. पटेल, नरेंद्र पाटील, शरद पाटील आदी वृक्षमित्रांनी अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला.