सर्वोदय विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांचे स्काउट राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST2021-06-18T04:21:50+5:302021-06-18T04:21:50+5:30
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ हे कोरोनाकाळात गेले. मात्र मध्यंतरीच्या काळात शाळा सुरू झाल्या होत्या. त्या परिस्थितीत महाराष्ट्र राज्य भारत स्काउट ...

सर्वोदय विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांचे स्काउट राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेत यश
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ हे कोरोनाकाळात गेले. मात्र मध्यंतरीच्या काळात शाळा सुरू झाल्या होत्या. त्या परिस्थितीत महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाइड मुंबई संस्थेतर्फे राज्य पुरस्कार चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. त्यात प्रकाशा येथील सर्वोदय विद्यामंदिराचे तीन विद्यार्थी राज्य पुरस्कार स्काउट चाचणी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यांची परीक्षा २२ ते २५ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान नंदुरबार येथील राजे शिवाजी विद्यालयात घेण्यात आली होती.
सर्वोदय विद्यामंदिराचे प्राचार्य ए.के. पटेल, उपमुख्याध्यापक डी.टी. चौधरी, पर्यवेक्षक चंद्रकांत पटेल, स्काउट शिक्षक नरेंद्र गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली विराज प्रशांत उपासनी, शिवम खंडू सामुद्रे व तुषार नितीन शिरसाठ हे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. प्रात्यक्षिक, तोंडी व लेखी स्वरूपात परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षक म्हणून नाशिकचे वाघचौरे होते. या परीक्षेत स्काउट चळवळीचा इतिहास, गाठी बांधणे, नकाशावाचन, नकाशा काढणे, शिट्टीचा खुणा, स्ट्रेचर, प्रार्थना, झेंडागीत, नियम, वचन आदींचा समावेश होता. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात सर्वोदय विद्यामंदिराचे तिन्ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नंदुरबार स्काउट कार्यालयाचे जिल्हा संघटन आयुक्त (गाइड) कविता वाघ, ज्ञानेश्वर सावंत, जोसेफ गावीत यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन मोतीलाल पाटील व सर्व संचालक मंडळाने यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.