खोंडामळी रुग्णालयातर्फे विद्यार्थ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:31 IST2021-09-03T04:31:08+5:302021-09-03T04:31:08+5:30
चित्रकला स्पर्धेत विद्यालयातून प्रियंका पाटील प्रथम, नेहा पाटील द्वितीय, हर्षल पाटील तृतीय व उत्तेजनार्थ पूनम साळुंके, सुवर्णा पाटील हे ...

खोंडामळी रुग्णालयातर्फे विद्यार्थ्यांचा गौरव
चित्रकला स्पर्धेत विद्यालयातून प्रियंका पाटील प्रथम, नेहा पाटील द्वितीय, हर्षल पाटील तृतीय व उत्तेजनार्थ पूनम साळुंके, सुवर्णा पाटील हे बक्षीसपात्र ठरले. रांगोळी पूजा पाटील व प्रांजल भामरे प्रथम, नीता मराठे व पूर्वा पाटील द्वितीय, वैष्णवी पाटील व रुचिता मराठे यांनी तृतीय तर खुशबू पाटील व नेहा पाटील यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. खोंडामळी ग्रामीण रुग्णालयात यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच मार्गदर्शक शिक्षकांना वृक्षरोप भेट देण्यात आले. कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुलोचना बागूल, के.पी. देवरे, आधिपरिचारिका हेमलता मराठे, अश्विनी अहिरे, डी.बी. भारती, वाय.डी. बागूल, व्ही.बी. अहिरे, अविनाश जाधव, वर्षा जोशी, ममता पावरा, शालूम शिंदे, ज्ञानेश्वर राठोड, किशोर शिंदे उपस्थित होते. मुख्याध्यापक डी.डी. साळुंके यांनी विद्यार्थ्यांचा गौरव केला. सूत्रसंचालन समुपदेशक प्रवीण पाटील यांनी तर आभार समुपदेशक ललीतकुमार तावडे यांनी मानले.