विद्यार्थ्यांनी तयार केले ‘कारागीर’ अॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 12:16 IST2020-06-19T12:16:30+5:302020-06-19T12:16:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘कारागीर’ या नावाचे मोबाईल ...

विद्यार्थ्यांनी तयार केले ‘कारागीर’ अॅप
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘कारागीर’ या नावाचे मोबाईल अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. त्याची लॉन्चींग समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
धावपळीच्या काळात आपल्या दैनंदिन छोट्या-मोठ्या कामांसाठी कुशल व अकुशल कारागिर व सर्व्हिस प्रोव्हायडर्स याची आपणास गरज वाटत असते व ते सहजासहजी उपलब्ध नसतात. आपली हीच गरज ओळखून व कौशल्य विकास अभियानाला चालना मिळावी म्हणून, या सर्व घटकांना एकाच मंचावर आणण्याचा छोटेखानी प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेने प्रेरित होऊन डी.एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी दर्शन पाटील, भूषण कोळी, प्रकाश सोनार यांनी आपल्या नंदुरबार जिल्हावासियांसाठी ‘कारागीर’ नावाचे एक सर्व्हिस प्रोव्हायडर मोबाईल अॅप्लिकेशन विकसित केले आहे.
या मोबाईल अॅप्लिकेशनच्या मदतीने आपण आपल्याला गरज असलेल्या सर्व प्रकारच्या कुशल व अकुशल कारागीरांशी व सर्व्हिस प्रोव्हायडरांशी ऐका क्लिकवर संपर्क साधु शकतात. कारागिर अॅप्लिकेशन आपल्याला खालील सर्व्हिसेस मिळवून देईल. यात प्लंबर, इलेक्ट्रीशियन, कारपेंटर, पेस्ट कंट्रोल, लोकल ट्रान्सपोर्ट आदींचा समावेश आहे. या अॅप्लिकेशनची लॉन्चिंग समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.जे. पाटील, प्राचार्य डॉ.डी.एम. पटेल, प्राचार्य डॉ.एस.पी. पवार, प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील, प्राचार्य बी.के. सोनी, प्लेसमेंट आॅफिसर प्रा.आर.एस. पाटील, संगणक विभाग प्रमुख प्रा.व्ही.एस. महाजन उपस्थित होते. हे अॅप्लिकेशन बनवण्यासाठी प्रा.विनय टी. पाटील आणि संगणक विभागाच्या प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले.