चेतक फेस्टीवलमध्ये विद्यार्थ्यांचाही सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:23 IST2019-12-21T12:23:50+5:302019-12-21T12:23:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेनिमित्त येथे सुरू असलेल्या चेतक महोत्सवात घोड्याच्या शर्यती, पर्यटकांसाठी मनोरंजन करणारे सांस्कृतिक ...

Students also participate in Chetak Festival | चेतक फेस्टीवलमध्ये विद्यार्थ्यांचाही सहभाग

चेतक फेस्टीवलमध्ये विद्यार्थ्यांचाही सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेनिमित्त येथे सुरू असलेल्या चेतक महोत्सवात घोड्याच्या शर्यती, पर्यटकांसाठी मनोरंजन करणारे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला.
चेतक फेस्टिवलमार्फत नृत्य स्पर्धा घेण्यात आली यात सारंगखेडा केंद्रातील सर्व जिल्हा परिषदेया शाळांनी सहभाग घेतला. त्यात जि.प.शाळा कळंबू येथील विद्यार्थ्यांनी ‘लाख मोलाच सोनं...’ या गाण्यावर नृत्य सादर केले. या नृत्याला प्रथम २१ हजारांचे बक्षीस देण्यात आले. द्वितीय ११ हजाराचे बक्षीस सारंगखेडा येथील केंद्रशाळा क्रमांक एकच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मल्हारी गाण्याला देण्यात आले. तर तृतीय क्रमांक सात हजाराचे बक्षीस जि.प. शाळा बिलाडी या शाळेने मिळावले. बिलाडी येथील विद्यार्थ्यांनी गजर माऊलीच्या या गीतावर नृत्य सादर केले होते.
विजेत्यांना चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या वतीने मान्यवराच्या उपस्थितीत बक्षीस देण्यात आले. यावेळी परीक्षार्थी म्हणून महेंद्रकुमार बाविस्कर, राजेंद्र गुरव व विजय नाईक यांनी काम पाहिले. कार्यक्रमात शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम, गटशिक्षणाधिकारी ए. डी. पाटील, क्रीडाधिकारी संजय सबनीस, तालुका क्रीडा अधिकारी बोर्डीकर, सिद्धार्थ कदम, धुळे जिल्हा क्रीडाधिकारी योगेश देवरे, शिक्षण विस्तार अधिकारी एम. एस. बंजारा, जे. ए. चौरे, एच. एस. तावडे, केंद्रप्रमुख वसंत जाधव, मुख्याध्यापक आर. बी. राजपूत आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी चेतक फेस्टिवलचे सदस्य रमेश पाटील, जितेंद्र गिरासे, शरद शिरसाठ, गणेश कोळी, दिनेश पाटील, विजय गिरासे, पुरुषोत्तम आगळे, विवेक वाडीले, विनोद तावडे, महेंद्र राजपूत, संदीप राजपूत, अजय पाटील, विलास चौधरी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Students also participate in Chetak Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.