वेळेवर एसटीबसच्या मागणीसाठी विद्याथ्र्याचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 22:09 IST2019-11-13T22:09:15+5:302019-11-13T22:09:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्याथ्र्याना परत जाण्यासाठी सायंकाळी वेळेवर बसेस मिळत ...

वेळेवर एसटीबसच्या मागणीसाठी विद्याथ्र्याचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्याथ्र्याना परत जाण्यासाठी सायंकाळी वेळेवर बसेस मिळत नसल्याने त्यांनी बुधवारी आंदोलनाचा पवित्रा घेतला़ दुस:या सत्रात पहिल्याच दिवशी विद्यार्थी बस आगारात आंदोलन करत असल्याने एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचा:यांची धांदल उडाली होती़
दिवाळीच्या सुटय़ा संपून दुस:या शालेय सत्राला बुधवारी सुरुवात झाली़ यानिमित्ताने विद्यार्थी दुपारी शाळा महाविद्यालयात रवाना झाले होत़े पाच ते सव्वापाच दरम्यान शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी बसस्थानकात परत आले होत़े परंतू बराच वेळ थांबूनही गावी जाणा:या बसेस सुटत नसल्याने अनेकांचा धीर सुटला़ त्यांनी थेट बस आगारात जाऊन बसेस सोडण्याची मागणी केली़ यावेळी बसेस उपलब्ध झाल्यानंतर देऊ असे सांगूनही विद्यार्थी व विद्यार्थिनींचे समाधान न झाल्याने त्यांनी बस आगारातच घोषणाबाजी सुरु करत आंदोलनाचा पवित्रा घेतला़ यावेळी आगारातील अधिका:यांनी त्यांना समजावूनही विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत़े
नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागासह खोंडामळी, कोपर्ली, दहिंदुले, भालेर, शिंदगव्हाण, काकर्दे, हाटमोहिदे या परिसरातील गावांकडे जाणा:या बसेस नसल्याने विद्याथ्र्याचे हाल सुरु होत़े यावेळी विद्याथ्र्यानी पूर्व भागातील काही राजकीय पदाधिका:यांना माहिती देत बोलावून घेतले होत़े त्यांनी येऊन मध्यस्थी केल्यानंतर बसेस देऊन नियोजन करण्यात आल़े सायंकाळी साडेसात वाजेर्पयत बसेस उपलब्ध नसल्याने विद्यार्थी बसस्थानक परिसरात फिरत असल्याचे दिसून आल़े नंदुरबार बसस्थानकात यापूर्वीही पासधारक विद्याथ्र्याना बसेस मिळत नसल्याचे प्रकार घडले आहेत़ याकडे संबधित एसटी महामंडळाकडून गांभिर्याने लक्ष दिले जात नसल्याने पासधारक विद्यार्थी वेळावेळी आक्रमक भूमिका घेत आहेत़ यातून येत्या काळात गंभीर प्रकार घडण्याची भिती आह़े
दरम्या सुरु असलेल्या या प्रकारामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागला़ आगारातून बसेस निघत नसल्याने काही बसेस उशिराने धावल्या़
नंदुरबार बसस्थानकातून ग्रामीण भागात सायंकाळी सोडण्यात येणा:या बसेसचे नियोजन चुकत असल्याचे ब:याचवेळा दिसून आले आह़े शाळांच्या वेळेनुसार त्या-त्या मार्गावरील विद्याथ्र्यासाठी बसेस सोडण्याची गरज असतानाही कारवाई करण्यात येत नसल्याने विद्याथ्र्यानी आंदोलन केल़े ब:याचवेळा बसेस उपलब्ध नसल्याने विद्याथ्र्याना सायंकाळर्पयत बसस्थानकात बसून रहावे लागत आह़े