नादुरूस्त बसमुळे विद्यार्थी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:17 IST2020-03-05T12:17:31+5:302020-03-05T12:17:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना दररोज एसटी बसमधून ये -जा करावी लागते. परंतु राज्य ...

Student suffering from bad bus | नादुरूस्त बसमुळे विद्यार्थी त्रस्त

नादुरूस्त बसमुळे विद्यार्थी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना दररोज एसटी बसमधून ये -जा करावी लागते. परंतु राज्य परिवहन महामंडळाच्या या नादुरुस्त बसमुळे चक्क विद्यार्थ्यांनाच बसला धक्का मारावा लागत असल्याचा प्रकार शहादा बस स्थानकात पहावयास मिळाला आहे.
शहादा डेपोच्या बसेस खिळखिळ्या झाल्यामुळे विद्यार्थ्यां आपला जीव मुठीत धरून राज्यपरिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करावा लागत आहे. याबाबीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने लक्ष देण्याची मागणी प्रवाशांसह विद्यार्थिनींनी केली आहे.
तालुक्यात गेल्या दीड महिन्यापूर्वी शहादाहुन मंदाण्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे रूंदीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला खोदकाम करण्यात आल्याने वाहनधारकांना रस्ता अरूंद झाल्यामुळे जीवधोक्यात घालून वाहन चालवावे लागत होते. परंतु या मार्गावर शहादा-शहाणा ही बस रस्त्याच्या खाली उतरल्याने बसची एक बाजू झुकली होती. त्यामुळे बसमधील प्रवाशी विद्यार्थ्यांनी प्रसंगावधान राखून खिडकीतून बाहेर उड्या मारल्या. बस जर चांगली राहिली असती तर बस खड्ड्यात झुकली नसती.
या सर्व घटना ताज्या असतांनाही शहादा शहरातील बस स्थानकात महामंडळाचा गलथान कारभार मात्र चव्हाट्यावर आला आहे. याबाबीकडे वेळीच महामंडळ कार्यालय शहादाने लक्ष न दिल्यास मोठी दुर्देवी घटना घडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Student suffering from bad bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.