भरधाव एस.टी.बसने बालिकेला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 12:14 IST2017-08-20T12:14:12+5:302017-08-20T12:14:12+5:30

जामली फाटय़ावरील घटना : संतप्त जमावाचा रास्तारोको

Studding ST buses crushed the child | भरधाव एस.टी.बसने बालिकेला चिरडले

भरधाव एस.टी.बसने बालिकेला चिरडले

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : भरधाव बसने जामली फाटय़ाजवळ आठ वर्षीय बालिकेस धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने महामार्गावर टायर पेटवून देत रास्तारोको केला. यावेळी अक्कलकुवा बसस्थानकात एका बसवर दगडफेक झाल्याने बसच्या काचा फुटल्या. शनिवारी दुपारी ही घटना घडली.
महिमा संदीप वळवी (आठ वर्ष) रा.जामली, ता.अक्कलकुवा असे बालिकेचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, ब:हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर अक्कलकुवानजीक जामली फाटय़ाजवळ भरधाव एसटी बसने (क्रमांक एमएच 14 बीटी 2233) रस्त्याच्या कडेला चालणा:या बालिकेला धडक दिली. त्यात महिमा ही बालिका जागीच ठार झाली.    याबाबत चेतना ईश्वर नाईक, कवली गव्हाण, ता.अक्कलकुवा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस चालकाविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महामार्गावर टायर जाळून रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूस मोठय़ा प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलीस पथक घटनास्थळी पोहचल्यानंतर वातावरणातील तणाव कमी झाला. परंतु दुपारी अक्कलकुवा बसस्थानकाच्या बाहेर जमावाने बसवर (क्रमांक एमएच 20-बीएल 2663) दगड भिरकावला. त्यात बसच्या पुढील काचा फुटल्या. यावेळी जमाव अपघात करणा:या बसच्या चालकाला ताब्यात द्या अशी मागणी करीत होता. या ठिकाणी देखील लागलीच पोलीस पथक पोहचल्याने पुढील अनर्थ टळला.
याबाबत बसचालक प्रदीप तुकाराम ठाकुर यांनी फिर्याद दिल्याने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Studding ST buses crushed the child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.