दिवाळीत एसटीचे उत्पन्न सहा कोटीच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 20:36 IST2019-11-09T20:36:04+5:302019-11-09T20:36:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दिवाळीच्या कालावधीत जिल्ह्यातील चारही आगारामार्फत हंगामी 10 टक्के भाडेवाड करण्यात आली होती. त्याशिवाय सर्वच ...

दिवाळीत एसटीचे उत्पन्न सहा कोटीच्या घरात
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दिवाळीच्या कालावधीत जिल्ह्यातील चारही आगारामार्फत हंगामी 10 टक्के भाडेवाड करण्यात आली होती. त्याशिवाय सर्वच आगारातून बसफे:याही वाढविण्यात आल्या, त्यामुळे यंदा चारही आगारांना एकत्रित हंगामी उत्पन्न पाच कोटी 42 लाख मिळाले आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, नवापूर, शहादा व अक्कलकुवा हे चार आगार आहे. या चारही आगारांमार्फत नेहमीप्रमाणे यंदाच्या दिवाळीतही 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कलावधीत हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. त्याशिवाय प्रवाशांया सुविधेसाठी चारही आगारांमार्फत वाढीव बसफे:यांही सोडण्यात आल्या होत्या. त्यात नंदुरबार आगारामार्फत 12 दिवासाच्या कालावधीत 108 बसफे:या अतिरिक्त सोडण्यात आल्या होत्या. या फे:या मागीलवर्षाच्या तुलनेत आठ फे:यांनी अधिक होत्या. नियमितसह वाढीस फे:यांच्या माध्यमातून नंदुरबार आगाराला यंदा 1 कोटी 32 लाखाचे उत्पन्न मिळाले. हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत 30 लाख अधिक असल्याचे सांगण्यात आले. शिवाय यंदा बसेस चार लाख 23 हजार किलोमिटरचे अंतर धावल्याचे देखील आगारामार्फत सांगण्यात आले.
शहादा आगारामार्फत यंदाच्या दिवाळी हंगामाच्या 25 ऑक्टोबरपासून 5 नोव्हेंबर्पयत एकुण 14 बसेस ज्यादा सोडण्यात आल्या होत्या. त्यात पंढरपूरसाठी एक, पुणे तीन, जेजूरी एक, परळी एक, कल्याण दोन, औरंगाबाद दोन, नाशिक तीन तर जळगावसाठी एक असे नियोजन करण्यात आले होते. त्याशिवाय 10 टक्के भाडेवाढीमुळे शहादा आगाराला या हंगामात एकुण एक कोटी 58 लाखाचे उत्पन्न मिळाले.
नवापूर आगारामार्फत देखील या कालावधीत रोज औरंगाबादसाठी दोन, पुणे चार, चोपडा दोन, जळगाव तीन, नाशिकसाठी तीन अशा अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या होत्या. तर अक्कलकुवा आगारामार्फत देखील दिवाळीच्या कालावधीत ज्यादा बसेस सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यातून अंदाजे एक कोटी 22 लाखाचे उत्पादन मिळाल्याचा अंदाज आहे.
परिवहन महामंडळामार्फत 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीसाठी 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. ही भाडेवाढ कमी करण्यात आली असली तरी दिवाळीनिमित्त मुळगावी तथा नंदुरबार जिल्ह्यात आलेल्या नागरिकांचा परतीचा प्रवास हा 12 नोव्हेंबर्पयत सुरू राहणार असल्याचे दिसून येत आहेत. मुलांच्या शाळा प्रामुख्याने 12 नोव्हेंबरनंतरच सुरु होणार असल्याने काही ज्यादा बसेस सुरू राहणार आहे.
नंदुरबार - एक कोटी 32 लाख
नवापूर - एक कोटी 30 लाख
शहादा - एक कोटी 58 लाख
अक्कलकुवा - एक कोटी 22 लाख
एकुण पाच कोटी 42 लाख