महिलेस डांबून ठेवत मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 12:09 IST2019-07-21T12:09:02+5:302019-07-21T12:09:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खडकापाणी ता़ अक्कलकुवा येथे महिलेला घरात डांबून ठेवत मारहाण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी ...

महिलेस डांबून ठेवत मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खडकापाणी ता़ अक्कलकुवा येथे महिलेला घरात डांबून ठेवत मारहाण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली़ याप्रकरणी गुन्हा दाखल आह़े
अक्कलकुवा पोलीस ठाण्यात विरोधात तक्रार दिल्याच्या रागातून वस्मीलाबाई रमेश वसावे यांना विलास खोजल्या वळवी, नरशी खोजल्या वळवी, पारशी खोजल्या वळवी आणि सविता विलास वळवी सर्व रा़ खडकापाणी यांना 19 रोजी घरात डांबून ठेवत मारहाण केली होती़ मारहाणीत वस्मीलाबाई ह्या गंभीर जखमी झाल्या़ याबाबत ओमेश धन्या वसावे यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस कॉन्स्टेबल शेवाळे करत आहेत़