शहाद्यात मुलीची छेडखानीवरून तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:30 IST2019-07-24T11:30:12+5:302019-07-24T11:30:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : क्लासला जाणा:या अल्पवयीन मुलीचा मंगळवारी सकाळी पाठलाग करून तिची छेड काढणा:या फळ विक्रेता युवकाच्या ...

Stress from a girl's imprisonment in martyrdom | शहाद्यात मुलीची छेडखानीवरून तणाव

शहाद्यात मुलीची छेडखानीवरून तणाव

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : क्लासला जाणा:या अल्पवयीन मुलीचा मंगळवारी सकाळी पाठलाग करून तिची छेड काढणा:या फळ विक्रेता युवकाच्या विरोधात शहादा पोलिसात  विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्यास अटक केली आहे. 
दरम्यान, या  घटनेची माहिती शहरात पसरताच जुन्या पोलीस ठाणे नजीक असलेल्या त्या फळ विक्रेत्याच्या दुकानावर मोठा जमाव झाला होता. पोलीस निरीक्षक संजय शुक्ला कमांडो फोर्स व पोलिसांचा ताफा घेऊन तात्काळ पोहोचल्याने  मोठा अनर्थ टळला. दुकानाभोवती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
फळ विक्रेता काही दिवसांपासून बारावीत असलेल्या एका अल्पवयीन मुलीची छेड काढत होता. मंगळवारी सकाळी नऊ वाजता  मुलगी  मैत्रिणींसोबत क्लासला  जात असताना म्युनिसिपल शाळेजवळ बागवान याने तिचा पाठलाग करीत तिच्याकडून जबरीने मोबाईल नंबर मागत छेड काढली. ही घटना त्या मुलीने घरी जाऊन भावाला सांगितली. त्यानी त्या फळविक्रेता बागवान यास शोधण्यासाठी त्याच्या दुकानाजवळ गर्दी केली. या घटनेची माहिती शहरात पसरताच  विविध संघटनेच्या कार्यकत्र्यांचा तरुणांचा जमाव जमा झाला. जमाव आक्रमक होत असल्याची खबर पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांना मिळताच ते तात्काळ कमांडोफोर्स व पोलीसांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करीत कठोर कारवाई चे आश्वासन दिल्याने मोठा अनर्थ टळला. खबरदारीच्या दृष्टीने सदर दुकान बंद करण्यात आले असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.
दरम्यान, मुलीच्या फिर्यादीवरून युनूस युसूफ बागवान याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल  झाला असून त्यास अटक करण्यात आली आहे.  तपास पोलिस उपनिरीक्षक डी. जे. बडगुजर करीत आहेत.    
 

Web Title: Stress from a girl's imprisonment in martyrdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.