रोटरीतर्फे ग्रामीण भागात लसीकरण जनजागृतीवर पथनाट्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:22 IST2021-05-31T04:22:45+5:302021-05-31T04:22:45+5:30
कोरोनाच्या लसीकरणासंदर्भात ग्रामीण भागात अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. ग्रामस्थांचे लसीकरणाबाबत गैरसमज दूर करून त्यांची लसीकरणासाठी मानसिक तयारी करण्यासाठी ...

रोटरीतर्फे ग्रामीण भागात लसीकरण जनजागृतीवर पथनाट्य
कोरोनाच्या लसीकरणासंदर्भात ग्रामीण भागात अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. ग्रामस्थांचे लसीकरणाबाबत गैरसमज दूर करून त्यांची लसीकरणासाठी मानसिक तयारी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नंदनगरी व तथापि ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्हाभरात पथनाट्यातून कोरोना लसीकरण जनजागृती अभियान यात्रा सुरू आहे. याअंतर्गत भादवड स्थानिक भाषेचा वापर करून नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर पथनाट्याचा प्रयोग सादर करण्यात आला. यावेळी भालेर केंद्रप्रमुख वसंत पाटील, सविता चंद्रकांत पाटील, बलदाणे सरपंच रागिनी पाटील, उपसरपंच, ग्रामपंचायत सर्व सदस्य, पोलीस पाटील अशोक संभू पाटील, ग्रामसेवक अनिल राठोड, कोतवाल प्रमोद पाटील आदी उपस्थित होते. यावेळी गावातून रॅली काढण्यात आली. प्रसंगी सुमन गावित, मुख्याध्यापक व्ही.एच. वळवी, मुख्याध्यापक सतीश पाटील, मुख्याध्यापक जी.एन. परदेशी यांच्यासह भालेर केंद्रातील कृती दलातील सर्व जि.प. शाळा व माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, गावातील अंगणवाडीसेविका, आशावर्कर, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या जनजागृती यात्रेंतर्गत बलदाणे, होळतर्फे रनाळे, कलमाडी, खोंडामळी, कोळदे या गावांमध्ये जनजागृती करण्यात आली. पथनाट्यात नागसेन पेंढारकर, तुषार ठाकरे, दर्शन भावसार, कुलभूषण पाटील, तुषार पाटील, जगदीश शिरसाठ, मोहन पाटील, यश पाटील, मयूर सावंत या कलावंतांनी सहभाग घेतला.