रस्त्यालगतचे घरमालक संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:16 IST2019-06-12T12:15:56+5:302019-06-12T12:16:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी गावात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी रस्त्याला लागून असलेली घरे पाडण्यात ...

रस्त्यालगतचे घरमालक संभ्रमात
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी गावात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी रस्त्याला लागून असलेली घरे पाडण्यात येतील की नाही याबाबत ग्रामस्थ संभ्रमात आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोळदा ते खेतिया दरम्यान सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. ज्या गावातून रस्ता जात आहे त्या गावातील रस्त्यावरील घरे पाडण्यात येत आहेत. ब्राrाणपुरी गावातून जाणा:या रस्त्याच्या रुंदीकरणासाठीही खोदकाम सुरू झाले. परंतु संबंधित विभागाकडून ग्रामपंचायत व रस्त्याला लागून असलेल्या घरमालकांना काहीही पत्र दिले नसल्याने घर पाडणार आहेत किंवा नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर घर पाडतील तर राहायला जायचे कुठे? कुटुंब उघडय़ावर येण्यानी वेळ तर नाही येणार असे विविध प्रश्न निर्माण होत आहे. एकीकडे शासनातर्फे बेघर कुटूंबाला राहण्यासाठी घराची सोय करण्यात येत आहे तर दुसरीकडे हे कुटुंब उघडय़ावर तर येणार नाहीत ना? असा प्रश्न ग्रामस्थांना सतावत आहे.
रुंदीकरण सारखेच करावे
ब्राrाणपुरी गावातून जाणा:या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हा रस्ता गावातून जात असल्याने रस्त्यालगत छोटे-मोठे घर असल्याने रस्ता मंजुरीप्रमाणे गावाबाहेरील येणा:या रस्त्याच्या रुंदीइतकाच गावातून जाणारा रस्ताही तयार करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.