सातपुड्यातील स्ट्रॉबेरी अजित पवारांना भेट देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:32 IST2021-02-10T04:32:10+5:302021-02-10T04:32:10+5:30
बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांची विकासासंदर्भातील बैठक होणार आहे. या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ ...

सातपुड्यातील स्ट्रॉबेरी अजित पवारांना भेट देणार
बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांची विकासासंदर्भातील बैठक होणार आहे. या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेी. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड हे देखील या बैठकीला जात असून, सातपुड्यातील पर्यटन विकासाला न्याय मिळावा यासाठी ते उपमुख्यमंत्र्याना स्ट्रॉबेरी भेट देणार आहेी. या स्ट्राॅबेरीचे उत्पादन नुकतेच सुरू झाले असून, त्याची चव ही महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीपेक्षा वरचढ ठरली आहे. तोरणमाळसह डाब व इतर परिसरात अनेक शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. या स्ट्रॉबेरीला बाजारपेठेसाठी सुविधा व्हावी व शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे या मागणीबरोबरच तोरणमाळ विकासाचा सुमारे ५० कोटी रूपयांचा आराखडा ते सादर करणार आहेत. तोरणमाळ हे पर्यटन विकासाच्या यादीत ब दर्जा देण्यात आला असून, त्यानुसार त्याचा विकास करण्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी ‘लाेकमत’शी बोलताना दिली.