मोलगी येथे २६ फेब्रुवारीला रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 12:15 IST2019-02-19T12:14:54+5:302019-02-19T12:15:09+5:30
नंदुरबार : मोलगी ता़ अक्कलकुवा येथील विविध समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिक २६ फेब्रुवारी रोजी धडगाव-अक्कलकुवा रस्त्यावर रास्तारोको करणार ...

मोलगी येथे २६ फेब्रुवारीला रास्ता रोको
नंदुरबार : मोलगी ता़ अक्कलकुवा येथील विविध समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिक २६ फेब्रुवारी रोजी धडगाव-अक्कलकुवा रस्त्यावर रास्तारोको करणार आहेत़ समस्या सुटेपर्यंत हे आंदोलन सुरु ठेवणार असल्याचा इशारा नागरिकांनी निवेदनाद्वारे दिले आहे़ मोलगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना हे निवेदन देण्यात आले आहे़
निवेदनात सार्वजनिक बांधकाम उपविभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, मोलगी ग्रामीण रुग्णालय, मोलगी कृषी मंडळ अधिकारी, बँक आॅफ महाराष्ट्र, दूरसंचार विभागाने मोलगीसह परिसरात विविध सोयी-सुविधा द्याव्यात या मागणीचे निवेदन दिले होते़ याबाबत सर्व विभागांकडून १५ फेबु्रवारीपर्यंत खुलासा करणे आवश्यक होते़ परंतू संबधित विभागांनी कोणताही कार्यवाही केलेली नाही, यामुळे येत्या २६ फेब्रुवारी रोजी बेमुदत रास्तारोको करण्याचा निर्धार करण्यात आला आहे़ निवेदनावर माजी सभापती सीक़े़पाडवी, जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत, अॅड़ सरदासिंग रुपसिंग वसावे, डॉ़ दिलवरसिंग रोता नाईक आदींसह परिसरातील नागरिकांच्या सह्या आहेत़