दगडफेक करणा:यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 12:20 IST2019-09-08T12:20:42+5:302019-09-08T12:20:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गणेश विसर्जन मिरवणुकीत रस्त्यांवर लावलेली वाहने हटविण्याच्या वादावरून काही समाजकंटकांनी आझाद चौक ते भवानी ...

दगडफेक करणा:यांवर कारवाई करा
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : गणेश विसर्जन मिरवणुकीत रस्त्यांवर लावलेली वाहने हटविण्याच्या वादावरून काही समाजकंटकांनी आझाद चौक ते भवानी चौकदरम्यान शुक्रवारी रात्री गणेशमूर्तीवर दगडफेक केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी त्या समाजकंटकांवर कारवाई करण्याऐवजी गणेशभक्तांवर कारवाई करीत असल्याच्या निषेधार्थ शनिवारी दुपारी 12 वाजता सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या आवारात संतप्त गणेशभक्त, गणेश मंडळांचे पदाधिकारी व विविध संघटनांनी उपविभागीय पोलीस अधिकारी पंडित सपकाळे, पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना निवेदन देऊन गणेशभक्तांवर विनाकारण कारवाई करू नये, मूर्ती खंडित व विटंबना करणा:या समाजकंटकांना कठोर कारवाई करून अटक करावी, त्यांच्यावर कारवाई न केल्यास पुढच्या टप्प्यातील एकही गणेश मंडळाचे विसर्जन होऊ देणार नाही, असा इशारा संतप्त गणेशभक्तांनी दिला
निवेदन देताना प्रा.मकरंद पाटील, अभिजित पाटील, अरुण चौधरी, डॉ.कांतीलाल टाटीया, जितेंद्र जमदाळे, अतुल जयस्वाल, तुषार पाटील, अरविंद कुवर, विनोद चौधरी, संजय चौधरी, यशवंत चौधरी, लक्ष्मण बडे, नगरसेवक संदीप पाटील, रोहन माळी, दिनेश खंडेलवाल, राजा साळी, अप्पू पाटील, संजय साठे, संतोष वाल्हे, गणेश मंडळांचे पदाधिकारी, विविध संघटनांचे कार्यकर्ते, भवानीनगर येथील महिला व नगरसेवक उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, आझाद चौकमार्गे शांततेत जाणा:या विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करणा:या समाजकंटकांना त्वरित कारवाई व्हावी, आझाद चौकातील दगडफेक करणा:या तरुणांची चौकशी होऊन तात्काळ कारवाई करून त्यांचा बंदोबस्त व्हावा, मूर्तीची विटंबना करणा:या समाजकंटकांना सीसीटीव्ही फुटेज पाहून त्यांना अटक करावी, पोलिसांनी त्या समाजकंटकांवर कारवाई करण्याऐवजी गणेशभक्तांवर सौम्य लाठीमार केला. तसेच त्यांच्यावरच कारवाई करीत आहे. त्यामुळे त्या समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हावी, गणेशभक्तांवर खोटे गुन्हे दाखल करू नये आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. जर गणेशभक्तांवर खोटे गुन्हे दाखल झाल्यास पुढील टप्प्यातील विसर्जन मिरवणुका स्थगित केल्या जातील व होणा:या परिणामास पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळी 11 वाजता भवानी चौकात 400 ते 500 महिलांसह मोठा जमाव झाल्याने तणाव निर्माण झाला होता. या परिसरात सातत्याने हिंदू महिलांवर हल्ले होतात, अशा संतप्त प्रतिक्रिया महिलांनी देऊन आझाद चौकात गोमाई नदीवर पूल झाल्याने या चौकात कायमस्वरूपी पोलीस चौकी द्यावी व सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित सुरू करण्यात यावेत, अशा मागण्या त्यांनी केल्या. पोलिसांनी महिलांची समजूत काढण्याचा प्रय} करीत त्या समाजकंटकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तणावाची परिस्थिती बघता कुकडेल आझाद चौक परिसर, भवानी चौक भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.