दारुच्या नशेत एकाच्या डोक्यात घातला दगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 12:08 IST2020-10-31T12:08:50+5:302020-10-31T12:08:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उभा राहू नको, घरी जा म्हणून सांगितल्याचा राग येऊन   एकाने दारूच्या नशेत डोक्यात ...

A stone was thrown at one's head while intoxicated | दारुच्या नशेत एकाच्या डोक्यात घातला दगड

दारुच्या नशेत एकाच्या डोक्यात घातला दगड

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उभा राहू नको, घरी जा म्हणून सांगितल्याचा राग येऊन   एकाने दारूच्या नशेत डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना नंदुरबारातील सिंधी कॅालनी भागात घडली. याबाबत उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला       आहे. 
पोलीस सूत्रांनुसार, शहरातील जुनी सिंधी कॅालनी परिसरात राजू प्रभूदास किंगर हा उभा होता.       त्याला तेथे उभा राहू नको व घरी जा असे कमलेश बलराम गुरुबक्शानी यांनी सांगितले. त्याच्या बोलण्याचा राग आल्याने राजू याने तेथे      पडलेला दगड उचलून कमलेश याच्या डोक्यात घातला. त्यात त्याचे डोके फुटले. 
याबाबत कमलेश गुरुबक्शानी यांनी फिर्याद दिली. राजू याने दारूच्या नशेत आपल्यावर दगडाने वार करून जखमी केल्याची फिर्याद पोलिसात दिली. 
त्यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार धनराज नागरे करीत आहे. 

Web Title: A stone was thrown at one's head while intoxicated