तरीही वनविभाग वाघाचा मागोवा घेणे सुरुच ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:26 IST2020-02-04T12:26:08+5:302020-02-04T12:26:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील ठाणेपाडा वनक्षेत्रात वाघ दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने आठ ट्रॅप कॅमेरे लावून वाघाचा माग ...

Still, the Forest Department will continue to track tigers | तरीही वनविभाग वाघाचा मागोवा घेणे सुरुच ठेवणार

तरीही वनविभाग वाघाचा मागोवा घेणे सुरुच ठेवणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील ठाणेपाडा वनक्षेत्रात वाघ दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने आठ ट्रॅप कॅमेरे लावून वाघाचा माग काढण्याचा प्रयत्न केला होता़ या प्रयत्नांना अपयश आले असून कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्याने येथे वाघाचे अस्तित्त्व नसल्याचे स्पष्ट झाले आहे़ परंतू येथे नाही, तर दुसरीकडे शक्यता असल्याने कॅमेऱ्यांची जागा बदलून वनविभाग वाघाचा मागोवा घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे़
जिल्ह्यात गेल्या वर्षापासून वाघाचे अस्तित्त्व असल्याचे बोलले जात आहे़ नवापुर आणि नंदुरबार तालुक्यात पसरलेल्या वनक्षेत्राच्या जवळपास असलेली गावे वाघ असल्याचा दावा सातत्याने करत आहेत़ या दाव्यांना रस्त्याने प्रवास करणारेही दुजोरा देत असल्याने नंदुरबार जिल्ह्यात वाघ असल्याचा निष्कर्ष काढला जात होता़ परंतू शास्त्रीयदृष्ट्या कोणताही पुरावा नसल्याने वनविभागाने नकार कायम ठेवला होता़ केवळ नकारावर न राहता शास्त्रीयदृष्ट्या पुरावे शोधण्याचे कामही त्यांनी हाती घेतले होते़ यांतर्गत ठाणेपाडा वनक्षेत्रात जागोजागी आठ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते़ या कॅमेºयांमध्ये वाघाऐवजी बिबटे आणि इतर वन्यजीवांचा वावर असल्याचे दिसून आले होते़ यातून नंदुरबार तालुक्याचे वनक्षेत्रात अद्यापही वन्यजीवांची संख्या ही समाधानकारक असल्याचे सांगण्यात येत आहे़
वाघाच्या निमित्ताने लावलेल्या ट्रॅप कॅमेºयातून यापूर्वी न दिसेलेले वन्यजीवही समोर आल्याने वनविभागाने समाधान व्यक्त केले असून त्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे़

ठाणेपाड्यात वाघ दिसून आला नसला किंवा त्याच्या खाणाखुणाही आढळल्या नसल्याने वनविभागाने येथील कॅमेरे काढून खोलघर पूर्व आणि पश्चिम तसेच अजेपूरच्या जंगलात लावण्याचे निश्चित केले आहे़ या परिसरात दाट जंगलाचा असल्याने या ठिकाणी काहीतरी मागमूस लागेल असा अंदाज आहे़ नवापुर तालुक्यातील चिंचपाडा, नवागाव या भागातही याच प्रकारे वनविभाग ट्रॅप कॅमेरे लावून वाघाचा माग काढण्याचा प्रयत्न करणार आहे़ दरम्यान वनविभागाच्या स्थानिक अधिकाºयांनी वाघाचे अस्तित्त्व असल्याची नागरिकांकडून देण्यात आलेल्या माहितीचा अहवाल नागपूर येथील अधिकाºयांकडे दिला होता़ त्यांनीही नंदुरबारात वाघ असल्याच्या माहितीचा मागोवा घेण्याच्या सूचना केल्या होत्या़ त्यानुसार कारवाई सुरु करण्यात आली आहे़
दरम्यान ठाणेपाड्यात लावलेल्या कॅमेºयांमध्ये वाघ दिसून आला नसला तरी त्याठिकाणी बिबट्या, उद्मांजर, ससे यासह विविध प्रकारच्या सर्पांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत़ रानडुक्कर आणि तरसांचा कळप दिसल्याची माहिती आहे़ वनविभागाला मिळालेल्या या माहितीमुळे या भागातील बºयाच प्राण्यांची गणना करणे सोपे झाले असून यातून येथे पुढील काळात या भागात वन्यप्राण्यांसाठी गरजेच्या उपाययोजना करणेही शक्य होणार आहे़

वाघाच्या अस्तित्त्वाच्या प्रश्नामुळे ठाणेपाडा वनक्षेत्र चर्चेत असताना सिंदबन मार्गाने भरधाव वेगात नंदुरबारकडे येणारी आणि जाणारी वाहने वन्यप्राण्यांसाठी धोका ठरत आहेत़ बºयाच वेळा वन्यप्राणी पाणी आणि अन्नाच्या शोधात रस्त्याच्या पलीकडे असलेल्या कापरा तलावाकडे धाव घेतात यात अपघाताची भिती आहे़ यातही वाळू नेणाºया डंपरांचा सर्वाधिक धोका असल्याने वनविभागाने त्यादृष्टीने पावले उचलत सिंदबन आणि ठाणेपाडा दरम्यान जागोजागी मार्गदर्शक फलक लावून वेगात प्रवास करणाºया वाहनधारकांना सूचित करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे़ रात्रीच्यावेळी वनकर्मचारी या भागात फिरुन चुकून रस्त्यावर एखादा हिंस्त्र प्राणी येऊ नये, यासाठी दक्षता घेणार आहेत़ वनविभागाने ठाणेपाड्यात वनपर्यटन प्रकल्पही सुरु केला आहे़ यापार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यात येत आहे़

Web Title: Still, the Forest Department will continue to track tigers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.