बसमधून पर्स चोरी करणा:यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:12 IST2019-09-30T12:12:47+5:302019-09-30T12:12:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बसमध्ये प्रवास करणा:या महिला प्रवाशीची पर्स चोरी करुन पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरटय़ास महिलेच्या ...

Stealing purse from bus: Arrested | बसमधून पर्स चोरी करणा:यास अटक

बसमधून पर्स चोरी करणा:यास अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बसमध्ये प्रवास करणा:या महिला प्रवाशीची पर्स चोरी करुन पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरटय़ास महिलेच्या मुलाने झडप घालून पकडत पोलीसांच्या ताब्यात दिल़े शनिवारी सकाळी सव्वा दहा वाजता शहादा बसस्थानकात ही घटना घडली़ 
भूषण नामदेव पानपाटील रा़ तुलसी नगर शहादा हे त्यांच्या आईसह  शिरपूर येथून शहादा येथे येत असताना आसिफ शहा अय्युब शहा रा़ गरीब नवाज कॉलनी, शहादा याने बसमध्ये भूषण पानपाटील यांच्या आईची पर्स चोरी केली होती़ बस शहादा बसस्थानकात आल्यानंतर तो बसमधून उतरुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पानपाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी झडप घालून पकडून ठेवल़े भूषण पानपाटील यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन असिफ शहा याच्याविरोधात गुन्हा दाखल आह़े आसिफ यास पोलीसांनी रविवारी शहादा न्यायालयात हजर केले होत़े 
 

Web Title: Stealing purse from bus: Arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.