शहाद्यात आदिवासी संघटनांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST2021-06-09T04:38:33+5:302021-06-09T04:38:33+5:30
जिल्ह्यातील आदिवासी एकता परिषद, अखिल भारतीय पावरा / बारेला समाज, बिरसा क्रांती दल, पावरा समाज उन्नती मंडळ, एकलव्य संघटना, ...

शहाद्यात आदिवासी संघटनांचे निवेदन
जिल्ह्यातील आदिवासी एकता परिषद, अखिल भारतीय पावरा / बारेला समाज, बिरसा क्रांती दल, पावरा समाज उन्नती मंडळ, एकलव्य संघटना, आदिराजे ग्रुप, बिरसा बिग्रेड, भारतीय ट्रायबल पार्टी जिल्ह्यातील सर्व संघटनांचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. निशा पावरा या शासकीय कर्मचारी आपल्या पथकासह आपली जबाबदारी पार पाडत असताना संबंधित नगरसेवकाने पावरा यांना जातिवाचक बोलू लागले. केस धरून ओढत खाली ढकलून देत दादागिरीच्या भाषेत धमकी देऊ लागला. ही घटना फक्त आदिवासी समाजासाठीच नाही तर पूर्ण महिला, कर्मचारी आणि मानवजातीला काळीमा फासणारी आहे. लोकशाही मूल्य नष्ट करून संविधानिक हक्क अधिमार दाबून ठेवणारे आहे. या घटनेबाबत दखल घेतली जात नसल्याने समाजात अधिक तीव्र रोष असल्याचे चित्र दिसत आहे, असे निवेदनात नमूद आहे. निवेदन देतेवेळी महिला प्रतिनिधी भिकाबाई पावरा, लक्ष्मी रावताळे, सुकन्या निकुंब, भाग्यश्री पावरा तसेच नामदेव पटले, कवी संतोष पावरा, जेलसिंग पावरा, सुभाष नाईक, दीपक ठाकरे, योगेश पावरा, सूरजित ठाकरे, संतोष पराडके, मोरे, जगदीश पवार, संतोष वळवी आदी सर्व संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नामदेव पटले म्हणाले की, संबंधित गुन्हेगारांवर निवेदनात म्हटल्याप्रमाणे योग्य ती कारवाई करावी अन्यथा लवकरच आदिवासी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल, असा इशारादेखील देण्यात आला.