ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST2021-06-27T04:20:29+5:302021-06-27T04:20:29+5:30
गेल्यावर्षी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षित जागेवर निवडून आलेल्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाने धुळे, नंदुरबार, अकोला, ...

ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत निवेदन
गेल्यावर्षी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षित जागेवर निवडून आलेल्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाने धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर या पाच जिल्हा परिषद व ३३ पंचायत समितीच्या उमेदवारांना अपात्र ठरविले. हा एकप्रकारे ओबीसी समाजावर अन्याय केला आहे. ओबीसी समाजाला लवकरात लवकर राजकीय आरक्षण परत मिळावे व ते निवडून आलेल्या जागा त्यांना परत मिळाव्या या मागणीचे निवेदन अक्कलकुवा तहसील कार्यालयातील राजरत्न सोनवणे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी भाजप अनुसूचित जमातीचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी, जि. प.चे माजी सदस्य कपिल चौधरी, पं. स. सदस्य ॲड. सुधीर पाडवी, बापू महिरे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कुणाल जैन, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील सूर्यवंशी, तालुका सरचिटणीस राहुल चौधरी, विजय कामे, महिला तालुकाध्यक्ष मधुराबाई पाडवी उपस्थित होते.