नाभिक समाज संघटनांतर्फे नवापूर तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:30 IST2021-04-08T04:30:37+5:302021-04-08T04:30:37+5:30

अत्यावश्यक सेवेतून सलून व पार्लर व्यवसायाला वगळून नाभिक समाजावर पुन्हा अन्याय करण्यात आला. याबाबत नवापूर शहरासह तालुक्यातील नाभिक संघटनेच्यावतीने ...

Statement to Navapur Tehsildar on behalf of Nuclear Society | नाभिक समाज संघटनांतर्फे नवापूर तहसीलदारांना निवेदन

नाभिक समाज संघटनांतर्फे नवापूर तहसीलदारांना निवेदन

अत्यावश्यक सेवेतून सलून व पार्लर व्यवसायाला वगळून नाभिक समाजावर पुन्हा अन्याय करण्यात आला. याबाबत नवापूर शहरासह तालुक्यातील नाभिक संघटनेच्यावतीने शासनाच्या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. निवेदनात म्हटले आहे की, नाभिक समाज भीक न मागता कष्ट करून पोट भरणारा श्रमजीवी घटक आहे. नाभिक समाजावर सातत्याने केंद्र व राज्य शासनाकडून अन्याय होत आहे. कोरोना काळातील शासनाच्या सर्व नियमांची आम्ही नाभिक समाज पालन करीत आहोत. समाजातील ८० टक्के कामगार कोणाच्या ना कोणाच्या सलून दुकानात कारागीर म्हणून कार्यरत आहेत. कोरोना काळात काही दुकान मालकांनी कारागिरांना सोडून दिले आहे. अशा परिस्थितीत आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. सलून व पार्लर बंद करून कोरोना कमी होणार आहे का ? सलून व्यावसायिकांच्या पोटापाण्याचा विचार शासनाने करावा, असे म्हटले आहे. निवेदन देण्यासाठी श्री संतसेना महाराज नाभिक हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष सुधीर निकम, उपाध्यक्ष मुकेश वारुळे, संचालक सिद्धेश्वर भदाणे, अनिल वारुळे, संजय सोनवणे उपस्थित होते.

Web Title: Statement to Navapur Tehsildar on behalf of Nuclear Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.