अनुप मंडलवर कारवाईसाठी जैन युवा शक्तीतर्फे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:22 IST2021-06-01T04:22:59+5:302021-06-01T04:22:59+5:30
निवेदनात म्हटले आहे की, जैन समाज एक शांतीप्रिय आणि अहिंसावादी समाज आहे. तसेच जैन समाजाचे साधू-संत हे महावीर भगवानचे ...

अनुप मंडलवर कारवाईसाठी जैन युवा शक्तीतर्फे निवेदन
निवेदनात म्हटले आहे की, जैन समाज एक शांतीप्रिय आणि अहिंसावादी समाज आहे. तसेच जैन समाजाचे साधू-संत हे महावीर भगवानचे अनुयायी मानले जातात व जैन धर्माचे साधू हे नेहमी समाजाला शांततेचा, अहिंसेचा व जीव दयेचा संदेश देतात. अनुप मंडल हे राजस्थानमधील सिरोही येथील नोंदणीकृत मुख्य कार्यालय असून, अमृत प्रजापती हे त्यांचे प्रमुख आहेत व ते जैन समाजावर व त्यांच्या साधू-संतांवर अप्रमाणित आक्षेप करत आहेत. अनुप मंडल हे केवळ जैन समाजच नाही तर संपूर्ण हिंदू सनातन धर्मावरही आक्षेप करतात. जनहितकारिणी नावाचे पुस्तक जे न्यायालयाने त्यावर प्रतिबंध लावलेले असूनही अनुप मंडल त्याचे प्रचार व प्रसार करतात. सोशल मीडियावर जैन धर्माच्या साधू-संतांवर खोटेनाटे आरोप करून त्यांना शिवीगाळही करतात. हिंदू धर्माचा प्रमुख ग्रंथ गीता यास देखील अनुप मंडल बदनाम करीत आहेत. अशाप्रकारे अनुप मंडल हे संपूर्ण जैन समाजाचा व हिंदू समाजाच्या भावना दुखवत आहेत, म्हणून जैन समाजातर्फे आता जर अनुप मंडलने आपले असे कार्य थांबविले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जैन युवाशक्तीचे अध्यक्ष ॲड. चंद्रशेखर संचेती, सचिव मनोज कोटडीया, समीर चोरडिया, ॲड. समीर टाटिया, भाजपचे शहराध्यक्ष विनोद गेलडा, ललित छाजेड, मोतीलाल चोरडिया, सुनील कोटडीया, पिंटू ओसवाल, जितेंद्र भंडारी, नरेश संचेती, रितुराज सुराणा आदी उपस्थित होते.