वैजाली ते काथर्दे फाटा रस्त्याच्या दुरुस्तीबाबत पालकमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:36 IST2021-08-18T04:36:16+5:302021-08-18T04:36:16+5:30
निवेदनात म्हटले आहे की, शहादा तालुक्यातील वैजाली ते प्रकाशा काथर्दे दिगर फाटापर्यंत साडेपाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली ...

वैजाली ते काथर्दे फाटा रस्त्याच्या दुरुस्तीबाबत पालकमंत्र्यांना निवेदन
निवेदनात म्हटले आहे की, शहादा तालुक्यातील वैजाली ते प्रकाशा काथर्दे दिगर फाटापर्यंत साडेपाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना मोठ्या कसरतीने वाहने रस्त्यावरून चालवत न्यावी लागतात. सातपुड्यातील २५ ते ३० गावांचे नागरिक दररोज या रस्त्याने जिल्ह्याच्या ठिकाणी ये-जा करतात. तसेच वाहनांची नेहमी वर्दळ असते. मात्र, त्यांना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रुंदीकरण व नवीन डांबरीकरण करून रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, असे म्हटले आहे. हे निवेदन पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन देण्यात आले. यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पं. स. सदस्य वीरसिंग ठाकरे, प्रवीण पाटील, नांदर्डेचे माजी उपसरपंच जितेंद्र चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते. लवकरच रस्त्याच्या दुरुस्तीबाबत आदेश देण्याचे आश्वासन पालकमंत्री ॲड. पाडवी यांनी दिले.