लसीकरण केंद्र वाढविण्याबाबतचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:28 IST2021-05-01T04:28:54+5:302021-05-01T04:28:54+5:30

आता शासनाने १८ वर्षांवरील व्यक्तिंना दिनांक १ मे २०२१पासून लस घेणेबाबत आवाहन केले असून, त्यासाठी शासनाने लस उपलब्ध केलेली ...

Statement on expansion of immunization center | लसीकरण केंद्र वाढविण्याबाबतचे निवेदन

लसीकरण केंद्र वाढविण्याबाबतचे निवेदन

आता शासनाने १८ वर्षांवरील व्यक्तिंना दिनांक १ मे २०२१पासून लस घेणेबाबत आवाहन केले असून,

त्यासाठी शासनाने लस उपलब्ध केलेली आहे. परंतु, आजच्या तारखेस पाहता अनेक तरुण, तरुणी तसेच नागरिक हे १८ वर्षांवरील आहेत. त्यांना सदरची लस घेणे आवश्यक असल्या कारणाने नवापूर शहरात तहसील कार्यालयासमोरील माणिकरावजी गावीत सभागृह उपलब्ध करुन दिल्यास अनेक रुग्णांना कोरोनाची लस घेणे सोयीचे होणार आहे.

तहसील कार्यालयाजवळील माणिकरावजी गावीत सभागृह उपलब्ध करुन

मिळावे, जेणेकरून शहरातील नागरिकांना सदर लस घेणे सोयीचे होणार आहे, तरी योग्य ती कार्यवाही

करुन सदर सभागृह लसीकरणासाठी उपलब्ध करुन मिळावे, असे निवेदनामध्ये म्हटले आहे. निवेदनावर भारतीय जनता पार्टीचे नवापूर युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश चौधरी, हेमंत शर्मा, योगेश शर्मा, सोनू दर्जी, संदीप पाटील, अनिल दुसाने, समीर दलाल, प्रदीप पाटील, योगेश खैरणार यांच्या सह्या आहेत.

Web Title: Statement on expansion of immunization center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.