भिलीस्थान टाईगर सेनेचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST2021-06-09T04:38:30+5:302021-06-09T04:38:30+5:30
निवेदनात म्हटले आहे की, ५ मे रोजी आदिवासी समाजाची महिला कर्मचारी नीशा पावरा ह्या आपली शासकीय सेवा बजावताना भाजप ...

भिलीस्थान टाईगर सेनेचे निवेदन
निवेदनात म्हटले आहे की, ५ मे रोजी आदिवासी समाजाची महिला कर्मचारी नीशा पावरा ह्या आपली शासकीय सेवा बजावताना भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांचे वाळूचे वाहन पावरा यांनी अडवले. या गाडीची रॉयल्टी आदेश आहे का, अशी चालकाला विचारणा केली असता गाडी चालकाने रस्त्यावरून गाडी उड्डाणपुलाखाली पळवली. परंतु नीशा पावरा व महिला कर्मचाऱ्यांनी गाडीचा पाठलाग करून गाडी पकडली. या ठिकाणी गाडीचा मालक गौरव चौधरी व त्यांचे गुंड साथीदार येथे आले व त्यांनी नीशा पावरा यांना अमानुष मारहाण केली तसेच जातीवाचक शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा या गुंड प्रवृत्तीच्या नगरसेवकावर तत्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करून योग्य त्या कलमाखाली गुन्हा दाखल करावा अन्यथा भिलीस्थान टाईगर सेनेतर्फे तीव्र निषेध मोर्चा काढण्यात येईल, याची नोंद प्रशासनाने घ्यावी. निवेदनावर भिलीस्थान टाईगर सेनेचे ॲड. नीलिमा गावीत, आर.सी. गावीत, लाजरस गावीत, विजय गावीत, विनेश गावीत, प्रशांत गावीत, अनिल गावीत, शरद गावीत यांच्या सह्या आहेत.