महिला तलाठी मारहाणप्रकरणी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:37 IST2021-06-09T04:37:59+5:302021-06-09T04:37:59+5:30
शहादा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. या वेळी अनिल कुवर, मोहन पवार, ...

महिला तलाठी मारहाणप्रकरणी निवेदन
शहादा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. या वेळी अनिल कुवर, मोहन पवार, ॲड. राजेंद्र ठाकरे व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनावर कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, तलाठी निशा पावरा या महसूल विभागाच्या पथकात नंदुरबार तालुक्यात बेकायदा वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यांना अडविल्याने, जाब विचारल्याने नगरसेवक गौरव चौधरी यांनी शासकीय कामात अडथळा आणून दमदाटी केली. जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी आदिवासी महिला कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करून जमिनीवर पाडले. याची तत्काळ चौकशी करून, गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा आदिवासी संघटनेतर्फे तसेच काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक मुकरंदे यांनी निवेदनात दिला आहे.