जुन्या पेन्शनसाठी राज्य कर्मचा:यांतर्फे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 12:07 IST2019-09-10T12:07:46+5:302019-09-10T12:07:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा:यांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी समन्वय समितीतर्फे सोमवारी ...

जुन्या पेन्शनसाठी राज्य कर्मचा:यांतर्फे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा:यांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी समन्वय समितीतर्फे सोमवारी एक दिवशीय आंदोलन करण्यात आले. शाळा बंदला मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला.
तहसील कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्यात विविध मागण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी. सर्व संवर्गातील वेतनत्रूटी दूर कराव्या. खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करून राज्यातील सर्व कार्यालयात कार्यरत कंत्राटी कर्मचा:यांना कायम करावे यासह इतर विविध मागण्यांचा त्यात समावेश आहे. 9 रोजी संप आणि 11 पासून बेमुदत संपाचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, प्राथमिक शिक्षक संघ थोरात गट, पाटील गट, प्राथमिक शिक्षक संघटना, राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघ, राज्य शिक्षक परिषद, शिक्षक संघटना, राज्य प्राथमिक शिक्षक समिती, पुरोगामी शिक्षक संघटना, अपंग कर्मचारी संघटना, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, जागृत शिक्षक संघटना, इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशन, केंद्रप्रमुख संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, आदिवासी शिक्षक संघटना, शिक्षक भारती संघटना, राष्ट्रवादी शिक्षक संघटना, एकल शिक्षक संघटना, शिक्षक सहकार संघटना, मागासवर्गीय शिक्षक संघटना, लढा शिक्षक संघटना, शिक्षक महासंघ, आस संघटना, राज्य तलाठी संघ, ग्रामसेवक संघटना, शिक्षण विस्तार अधिकारी संघटना, केंद्रप्रमुख संघटना, राज्य तलाठी संघ आदी सहभागी झाले.