वाहतूक शाखेला मिळाले अत्याधुनिक वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 12:14 IST2019-11-14T12:14:18+5:302019-11-14T12:14:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पोलीस दलातील वाहतूक शाखेला नवीन अत्याधुनिक वाहन उपलब्ध झाले आहे. या वाहनातील उपकरण हाताळणीचे ...

State-of-the-art vehicle received by the traffic branch | वाहतूक शाखेला मिळाले अत्याधुनिक वाहन

वाहतूक शाखेला मिळाले अत्याधुनिक वाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पोलीस दलातील वाहतूक शाखेला नवीन अत्याधुनिक वाहन उपलब्ध झाले आहे. या वाहनातील उपकरण हाताळणीचे चालक आणि अधिकारी यांना नुकतेच प्रशिक्षण देखील देण्यात आले. 
पोलीस दलात वाहतूक शाखेला मोठे महत्त्व असते. दैनंदिन वाहतूक सांभाळणे आणि व्हीआयपी व्यक्ती आल्यास त्यांच्या वाहन ताफ्याचे पायलटींग करणे ही कामे महत्वाची असतात. त्यामुळे पोलीस दलाने राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलीस दलात प्रत्येकी एक वाहन उपलब्ध करून दिले आहे. या सुङिाकी कंपनीच्या आर्टीका मॉडेलचे हे वाहन आहे. या वाहनात अत्याधुनिक उपकरणे जोडण्यात आले आहेत. त्यात स्पीड गन असून भरधाव जाणा:या वाहनांवर स्पीड गन रोखल्यास त्या वाहनाचा वेग किती हे कळते लागलीच त्याचा फोटो काढून संबधीत वाहनधारकाच्या मोबाईलवर कारवाईचा मेसेज जातो. 
ब्रेथ अॅनालायझर देखील या वाहनात आहे.  वाहनचालकाने मद्यपान केले असल्यास या उपकरणाला तोंड लावताच त्याच्या रक्तात  किती अल्कहोल आहे हे कळणार आहे. याशिवाय वाहनाच्या काचेवर काळी फिल्म लावली आहे काय? हे कळते. याशिवाय इतरही विविध उपकरणे या वाहनात लावण्यात आली आहेत.
वाहन आणि त्यातील उपकरणांचे प्रशिक्षण वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक राहुल शेजवळ आणि चालक जितेंद्र महाले यांनी घेतले. जळगाव, धुळे, नंदुरबार येथील अधिकारी व कर्मचा:यांना धुळे येथे यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले.    
 

Web Title: State-of-the-art vehicle received by the traffic branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.