दोन्ही बाजूचे काम सुरू केल्याने वाहतुक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:38 IST2020-03-02T11:37:54+5:302020-03-02T11:38:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाहतुक सुविधांमध्ये भर टाकण्यासाठी अक्कलकुवा ते आमलीबारी रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे काम हाती घेण्यात आले ...

दोन्ही बाजूचे काम सुरू केल्याने वाहतुक कोंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वाहतुक सुविधांमध्ये भर टाकण्यासाठी अक्कलकुवा ते आमलीबारी रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु दोन्ही बाजूचे काम एकदाच सुरु झाल्यामुळे काही अंशी वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.
दुर्गम भागासह अक्कलकुवा भागातील प्रवाशांनाही सोयीचा ठरणाऱ्या अक्कलकुवा ते आमलीबारी रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामात संबंधित ठेकेदारांकडून पथमत: साईडपट्ट्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. हा रस्ता नव्याने तयार झाल्यास बहुसंख्य प्रवासी व वाहनधारकांची सोय होणार आहे, यात शंका नाहीच. परंतु दोन्ही बाजुच्या साईडपट्ट्यांचे काम एकदाच हाती घेतल्यामुळे या रस्त्यावर सुरु असलेल्या वाहतुक प्रभावीत झाली आहे. वाहनधारकांना समस्येला तोंड द्यावे लागत असून एकाच बाजूचे काम हाती घेत ते पूर्ण केल्यानंतरचसंबंधित ठेकेदारांनी दुसºया बाजूच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी या मार्गावरुन नियमित प्रवास करणाºया प्रवाशांसह वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.