आजपासून मतदान यंत्र सील करण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 12:40 IST2019-10-14T12:40:19+5:302019-10-14T12:40:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील सर्वच मतदार संघातील मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया रविवारी घेण्यात आली. येत्या दोन दिवसात ...

आजपासून मतदान यंत्र सील करण्यास सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील सर्वच मतदार संघातील मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया रविवारी घेण्यात आली. येत्या दोन दिवसात या मतदान यंत्रांना राजकीय प्रतिनिधींसमोर सील करण्यात येणार आहे.
त्या त्या मतदारसंघात प्राथमिक तपासणी झालेली बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट यंत्रे तहसील कार्यालय तथा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सुरक्षा कक्षात ठेवण्यात आली आहेत. रविवारी या यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेकरिता उमेदवार प्रतिनिधी उपस्थित होते.
येत्या दोन दिवसात अर्थात 14 व 15 रोजी अशा प्रकारे सरमिसळ करण्यात आलेली यंत्रे मतदानाकरिता सेट व सिल करण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासुन सदर प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. या प्रक्रियेदरम्यान प्रत्येक यंत्रावर प्रारूप मतदान घेतले जाणार असुन यंत्रे सुयोग्य पद्धतीने सेट करण्यात आल्याची पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच रँडम पद्धतीने पाच टक्के मतदान यंत्रांवर प्रत्येकी एक हजार मते देण्यात येणार असुन त्यांच्या सुस्थितीत असण्याची खात्री करण्यात येणार आहे.
या संपुर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार असुन उमेदवार वा त्यांचे प्रतिनिधी वा राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी संपुर्णवेळ उपस्थित राहु शकतात. याबाबतदेखील संबंधितांना कळविण्यात आले आहे. उमेदवार वा प्रतिनिधींना यंत्रांचे क्रमांक, मतमोजणी केंद्र याबाबतची माहितीदेखील लेखी स्वरूपात पुरविण्यात येणार आहे. सुरक्षा कक्षाला चोवीस तास अखंड सशस्त्र पोलीस बंदोबस्त असुन सेटींग सिलिंग प्रक्रिये दरम्यानही अतिरिक्त दक्षता घेण्यात येत आहे.
संपुर्ण निवडणुक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने निवडणुक आयोग व जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन प्राप्त सुचनांचे पालन करण्यात येत असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिका:यांनी दिली.