सलुन व्यवसाय सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 12:06 IST2020-06-12T12:06:48+5:302020-06-12T12:06:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सलुन व्यवसाय सुरू करण्यास परवाणगी द्यावी किंवा आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नाभिक दुकानदार ...

सलुन व्यवसाय सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सलुन व्यवसाय सुरू करण्यास परवाणगी द्यावी किंवा आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नाभिक दुकानदार युनियनतर्फे करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही निवेदनात करण्यात आला आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनाच्या आदेशानुसार २३ मार्चपासून सलुुन व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमध्ये बºयाच प्रमाणात सूट देण्यात आली आहे.
अनेक व्यवसाय सुरू झाले आहेत. परंतु सलुन व्यवसाय बंदच आहेत. यामुळे अन्याय होत आहे. एकतर सलुन व्यवसाय सुरू करण्यास परवाणगी द्यावी किंवा आर्थिक मदत द्यावी. विविध पातळीवर यासाठी पाठपुरावा सुरू आहे. परंतु यश येत नसल्यामुळे समाज हवालदिल झाला आहे.
या संदर्भात मागणी मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देखील या निवेदनात नाभिक दुकानदार युनियनतर्फे अध्यक्ष धनराज वरसाळे, उपाध्यक्ष घन:शाम नांदेडकर, सचिव निहाल हुसेन यांनी केले आहे.