रोजगार हमी योजनेची ग्रामपंचायतीमार्फत अधिकाधिक कामे सुरू करा-जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:34 IST2021-08-28T04:34:15+5:302021-08-28T04:34:15+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, उपजिल्हाधिकारी ...

Start more works of employment guarantee scheme through Gram Panchayat-Collector | रोजगार हमी योजनेची ग्रामपंचायतीमार्फत अधिकाधिक कामे सुरू करा-जिल्हाधिकारी

रोजगार हमी योजनेची ग्रामपंचायतीमार्फत अधिकाधिक कामे सुरू करा-जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी खत्री म्हणाल्या, कमी पावसामुळे शेती उत्पादन कमी होण्याची शक्यता लक्षात घेता कामाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेल्फवरील कामे त्वरित सुरू करण्यात यावेत. ग्रामपंचायत ही सक्षम यंत्रणा असल्याने गावस्तरावर अधिक कामे घेणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या आवश्यकतेनुसार कामे त्वरित सुरू करावीत. डोंगराळ भागात वन विभागाने नवीन कामे सुरू करून नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. काम वेळेवर उपलब्ध होईल, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण केल्यास गाव विकासाची चांगली कामे होण्यासोबत स्थलांतर रोखता येईल.

अधिकाऱ्यांनी दररोज शेल्फवरील कामांचा आढावा घ्यावा. १५ सप्टेंबरपर्यंत कामे सुरू करण्याचे नियोजन करावे. सिंचन विहिरींची मंजूर कामे करण्यास संबंधित तयार नसल्यास त्याऐवजी गरजूंना अशी कामे देण्यात यावीत. शाळा-अंगणवाडी समोरील रस्ते, संरक्षक भिंत, खेळाचे मैदान, सार्वजनिक विहीर, सपाटीकरण अशी उपयुक्त कामे घ्यावीत. पुढील वर्षांसाठी विहीर पुनर्भरण कामाचे नियोजन आतापासून करावे. अंगणवाड्यांची अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावीत. जलशक्ती अभियानांतर्गत शोषखड्ड्यांची कामे त्वरित पूर्ण करावीत. शेततळे, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड, कंपार्टमेंट बंडिंग, सीसीटी अशा उपयुक्त कामांचे नियोजन करावे. नेहमीच्या तुलनेत यावर्षी दुप्पट कामांचे नियोजन करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बैठकीस तहसीलदार, गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी, वन आणि सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Start more works of employment guarantee scheme through Gram Panchayat-Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.