अक्कलकुवा-मुंबई बस सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:32 IST2021-08-23T04:32:44+5:302021-08-23T04:32:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : ग्राहक पंचायत महाराष्ट्र, तळोदा शाखेचे व महाराष्ट्र प्रवासी महासंघ शाखा तळोद्याच्या पदाधिकाऱ्यांनी अक्कलकुव्याचे आगरप्रमुख ...

अक्कलकुवा-मुंबई बस सुरू करा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : ग्राहक पंचायत महाराष्ट्र, तळोदा शाखेचे व महाराष्ट्र प्रवासी महासंघ शाखा तळोद्याच्या पदाधिकाऱ्यांनी अक्कलकुव्याचे आगरप्रमुख फुलपगारे व उपप्रमुख सी.एन. सूर्यवंशी यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा करीत आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, अक्कलकुवा आगरातून सायंकाळी चार वाजता सुटणारी अक्कलकुवा-मुंबई ही बस सेवा बंद करण्यात आली आहे. ही बस व्यापारी, प्रवासी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची होती. ही बस बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तरी ही बस सेवा पूर्ववत करावी व इतर ही लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू कराव्यात. तसेच लाॅकडाऊन काळातील पासधारक विद्यार्थ्यांना पासची मुदत वाढवून देण्यात यावी. गाड्या नियमित स्वच्छ कराव्यात, ज्येष्ठ नागरिकांना निम्म्या भाड्याच्या पास मिळाव्यात तसेच ग्रामीण भागातील बस सेवा पुन्हा सुरू कराव्यात अश्या अनेक विषयांवर चर्चा करीत निवेदन देण्यात आले.
या वेळी नंदुरबार जिल्हा ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष कीर्तीकुमार शहा, जिल्हा संघटक प्रा.आर.ओ. मगरे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा तळोद्याचे अध्यक्ष अशोक सूर्यवंशी, महाराष्ट्र प्रवासी महासंघ शाखा तळोद्याचे अध्यक्ष राजेश चौधरी, रमेशकुमार भाट उपस्थित होते.