मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या खर्चावरुन पालिकेत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:38 PM2020-01-29T12:38:27+5:302020-01-29T12:38:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालिकेच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी येत्या काळात शहरात येणाºया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमासाठी ...

Standing in the municipality at the expense of the Chief Minister's visit | मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या खर्चावरुन पालिकेत खडाजंगी

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या खर्चावरुन पालिकेत खडाजंगी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पालिकेच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी येत्या काळात शहरात येणाºया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमासाठी पालिकेने खर्च देण्याच्या मुद्द्यावरुन सर्वसाधारण सभेत सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपाच्या नगरसेवकांमध्ये जुंपली होती़ या गदारोळातच १० विषयांना मंजूरी देण्यात आली़
पालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्षा भारती राजपूत होत्या़ पिठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी डॉ़ बाबूराव बिक्कड होते़ सभेत विषयांना मंजूरी दिली जात असताना विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंदुरबार दौºयावर येणार असल्याने त्या कार्यक्रमासाठी येणाºया सभांव्य खर्चास मंजूरी देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला़ यावर भाजपाच्या नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांच्या दौºयाचा खर्च हा शासन करते, पालिकेने त्यावर खर्च करण्याची सध्याची स्थिती नाही़ याउलट पालिकेने नागरिकांची घरपट्टी माफ करावी, संबधित विकास कामांचा ठेका घेणाºया ठेकेदाराने हा खर्च करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली़ यावर सत्ताधारी काँग्रेसने सूचना मान्य असल्याचे सांगत विषयाला मंजूरी दिली़
दरम्यान पालिकेच्या सभेत २०२०-२०२१ या वर्षात पाणी पुरवठा करणाºया पाईप लिकेज दुरुस्ती करण्यासाठी तसेच पाणी पुरवठा विभागाकडील इतर कामे करण्यासाठी ठेकेदार नियुक्त व खर्चा मंजूरी देण्याच्या विषयावरही भाजपाच्या सदस्यांनी आक्षेप घेत सहा वर्षांपासून लिकेजचा ठेका एकाच ठेकेदाराला देऊन कामे होत नसल्याचा आरोप केला़
सभेत बांधकाम समिती सभापती दिपक दिघे, नगरसेवक परवेज खान, किरण रघुवंशी, मोहितसिंग राजपूत, सभापती कैलास पाटील, भाजपा गटनेते अ‍ॅड़ चारुदत्त कळवणकर, नगरसेवक गौरव वाणी यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती़

सभेत नगरपालिकेच्या नियोजित मॉँ-बेटी उद्यानात सौंदर्यीकरण व सुशोभिकरणांतर्गत महिलांचे १० पूर्णाकृती पुतळे उभारण्यास मंजूरी देण्याबाबत चर्चा करण्यात आली़ या चर्चेत सहभागी होताना नगरसेवकांनी दिवंगत केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि स्वातंत्र्यसेनानी कमलताई मराठे यांचे पूर्णाकृती पुतळे उभारावेत अशी मागणी करण्यात आली़ यामागणीवर विचार करुन लवकरच पालिका याबाबत अधिकृत कार्यवाही सुरु करणार असल्याची माहिती उपस्थितांना सभेत देण्यात आली़ पालिकेची सभा संपल्यानंतर प्रभारी नगराध्यक्षा भारती राजपूत यांच्याहस्ते शहरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना नगरपालिकेन्च्यावतीने तीनचाकी सायकलींचे वाटप करण्यात आले़

श्रीराम नगर-२ आणि नमस्कार कॉलनीतील रस्ते मजबूतीकरण व डांबरीकरण करण्याच्या कामासाठी २० लाख ७० लाख ५९९ रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्याचा ठराव पारित झाला़
झराळी येथील दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रासाठी २०२०-२०२१ या वर्षात लागणारे ब्लिचिंग पावडर, तुरटी, क्लोरीन, लिक्विड गॅस टनर खरेदी करण्याच्या खर्चास मंजूरी देण्यासह वार्षिक दर मागण्याबाबत विचार विनिमय करणे़
४पाणी पुरवठा विभागातील ईलेक्ट्रीक मोटारी दुरुस्ती खर्च, नवीन मोटारींची खरेदी, दिव्यांग लाभार्थींना साहित्य वाटप, सेवानिवृत्ताच्या जागी वारसाची नियुक्ती करणे तसेच पालिकेच्या प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदार नियुक्त करण्यास मंजूरी देण्यात आली़

Web Title: Standing in the municipality at the expense of the Chief Minister's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.