सारंगखेडा परिसरात शेतांमध्ये साचले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST2021-09-04T04:36:38+5:302021-09-04T04:36:38+5:30
या पावसामुळे ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती शेतकऱ्यांबाबत झाली आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. यात सोयाबीन, ...

सारंगखेडा परिसरात शेतांमध्ये साचले पाणी
या पावसामुळे ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती शेतकऱ्यांबाबत झाली आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. यात सोयाबीन, कापूस, तूर, मका, ज्वारी, बाजरीसह इतर पिकांना जीवदान मिळाले खरे परंतु या पावसाने अनेक शेत पाण्याने तुडुंब भरलेली आहेत. काही ठिकाणी सोयाबीन तर काही ठिकाणी कापूस पाण्याखाली गेल्याचे चित्र सारंगखेडा व परिसरात दिसत आहे. त्याचबरोबर जोरदार पावसाने ऊस संपूर्ण आडवा पडल्याने उसाचे मोठे नुकसान झाले. मे महिन्यात लागवड केलेल्या कापसाचे पीक पाण्याखाली गेल्याने ते वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. उशिरा का होईना आलेल्या पावसाने काही शेतकऱ्यांना आनंदित केले तर काही शेतकऱ्यांना पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे दु:खी केल्याचे चित्र आहे. शेतकरी हा कायम आशावादी असतो. खरिपाची भर रब्बीत निघेल या आशेवर तो हे नुकसानदेखील पचवण्यासाठी तत्पर असतो. पाण्यात बुडालेल्या कापसाच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.