जिल्ह्यातील सर्वच आगारातील ईटीआय मशीन सुस्थितीत असल्याचा एसटीचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:30 IST2021-07-29T04:30:51+5:302021-07-29T04:30:51+5:30
नंदुरबार : कोरोनामुळे एसटीची सर्वाधिक दयनीय अवस्था आहे. वाढलेले डिझेल दर आणि घटलेले प्रवासी यामुळे उत्पन्न आणि खर्च यांचा ...

जिल्ह्यातील सर्वच आगारातील ईटीआय मशीन सुस्थितीत असल्याचा एसटीचा दावा
नंदुरबार : कोरोनामुळे एसटीची सर्वाधिक दयनीय अवस्था आहे. वाढलेले डिझेल दर आणि घटलेले प्रवासी यामुळे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसवण्यात एसटी आगारांना जड जात आहे. यात आता काही ठिकाणी ईटीआय मशीनबाबत अडचणी येत आहेत. यावर मार्ग काढत आगारांनी जुन्या पद्धतीने तिकिटे देण्यास प्रारंभ केला असून हेही सोयीचे असल्याचे सांगण्यात आले आहे.
एसटीने नियुक्त केलेल्या कंपनीकडे दिलेले मशीन वेळेवर येत नसल्याने जुन्या पद्धतीने तिकिटांचे वाटप करण्यात येत आहे. वाहकांना जुन्या पद्धतीचीही आठवण रहावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. दरम्यान, मशीन पुरवठादार कंपनीतून अडचणी असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यातील चारही आगाराचे उत्पन्न घटले आहे. सध्या ग्रामीण भागातील बस पूर्णपणे बंद आहेत.प्रवाशांची संख्या कमी असल्याने उत्पन्न घटले आहे. डिझेल दरवाढीचा मोठा फटका बसला आहे.
वाहकांची पुन्हा आकड्यांची जुळवाजुळव
एसटी महामंडळात नोकरीसाठी आलेल्या वाहकांना तिकीट व्हेडिंगची अट आहे. ही तिकिटे कशी काढावीत याचे प्रशिक्षण देण्यात येते. परंतु बरेच वाहक हा व्यवहार विसरत असल्याने पुन्हा त्यांना तिकिटांची जुळवाजुळव करण्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रयोग येत्या काळातील नवीन बदलासाठी असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पगार मिळतोय हेच नशीब
टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्यांची ड्युटी लागत असून जितके दिवस ड्युटी तितक्याच दिवसांचा पगार दिला जातो. काही कर्मचाऱ्यांना अजूनही ड्यूटीची प्रतीक्षा आहे.बससेवा सुरु झाली असली तरी ग्रामीण भागातील बस अजून सुरु झालेल्या नाहीत.