खापर येथे एसटी बसेसला होतोय अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:33 IST2021-08-19T04:33:39+5:302021-08-19T04:33:39+5:30
खापर गावात पूर्वी येथे एसटीचे बस थांबा शेड होते. परिसरात मोकळी जागा उपलब्ध असल्याने याठिकाणी बसेस थांबत होत्या. मोकळी ...

खापर येथे एसटी बसेसला होतोय अडथळा
खापर गावात पूर्वी येथे एसटीचे बस थांबा शेड होते. परिसरात मोकळी जागा उपलब्ध असल्याने याठिकाणी बसेस थांबत होत्या. मोकळी जागा असल्याने बसेस वळवण्यासाठी अडचण येत नव्हती; परंतु बस स्थानक शेड खासगी मालकीचे असल्याचा दावा संबंधिताने कोर्टात दाखल केला होता. त्यांच्या बाजूने निकाल देण्यात आल्यानंतर याठिकाणी गाळे उभारणी करण्यात येत आहे. सोबतच याठिकाणी बांधकामे सुरू झाली आहेत. सोबतच या भागात खासगी वाहनेही उभी करण्यात येत असल्याने दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे.
वाहतुकीच्या कोंडीमुळे एसटीचालक व वाहनधारक यांच्यात वाद होत असल्याचे दिसून येत आहे. एसटीचा धक्का लागल्यानंतर वाहनधारकांकडून भरपाई मागत असल्याचे प्रकार होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे बहुतांश बसचालक कोराई फाट्यावरच बसेस थांबवून प्रवासी सोडून देत आहेत. यातून वयस्कर नागरिक व लहान मुले यांना गैरसोयीचे ठरत आहे. यामुळे खापर बसस्थानक परिसरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करून बसेसचा येण्या-जाण्याचा रस्ता मोकळा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.