पॉलिशच्या बहाण्याने अडीच लाखाचे दागीने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:19 IST2019-11-17T14:19:01+5:302019-11-17T14:19:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पॉलिशच्या बहाण्याने महिलेकडून अडीच लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या चार बांगडय़ा घेवून दोघे पसार झाल्याची ...

पॉलिशच्या बहाण्याने अडीच लाखाचे दागीने लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पॉलिशच्या बहाण्याने महिलेकडून अडीच लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या चार बांगडय़ा घेवून दोघे पसार झाल्याची घटना नंदुरबारात घडली. शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबारातील अग्रवाल पेट्रोलपंपाच्या बाजुला राहणा:या सोनल बिपीनचंद्र वाणी या 15 रोजी सकाळी 11 वाजता घरात एकटय़ा असल्याचे पाहून दोनजण त्यांच्याकडे आले. सोन्याच्या दागीन्यांना पॉलिश करून देण्याचे त्यांनी सांगितले. सोनल वाणी यांनी देखील त्यांच्यावर विश्वास ठेवून अडीच लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या चार बांगडय़ा त्यांच्याकडे पॉलिशसाठी दिल्या. हातचलाखी करून दोघा भामटय़ांनी बांगडय़ा घेवून पोबारा केला. ही बाब सोनल वाणी यांना समजताच त्यांनी इतरांना सांगितले. दोघा भामटय़ांची शोधाशोध करण्यात आली. परंतु उपयोग झाला नाही. दोघे भामटे हे 40 ते 45 वर्ष वयाचे होते. हिंदी आणि मराठी भाषा बोलत असल्याचे वाणी यांनी सांगितले. याबाबत दोघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार इनामदार करीत आहे.
अल्पवयीन मुलीस पळवून नेले
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी एकाविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव, ता.शहादा येथे 11 रोजी ही घटना घडली. संशयीताचा शोध घेतला जात आहे.